मुंबईतल्या हॉटेलात आलाय लष्करी थाट!

तुम्हाला फुल्ल टू लष्करी वातावरण आऊटपोस्ट इथं अनुभवता येणार आहे. खाण्यापासून ते पिण्यापर्यंत सगळ्यामध्येच लष्करी थीमची एक झलक इथे दिसते. लष्करात रोज रात्री ड्रिंक करून इतर साथीदारांशी गप्पा मारण्याची परंपरा आहे. तीच स्टाईल आऊटपोस्ट लाऊंजमध्ये तुम्हाला अनुभवता येणार आहे.

  • मुंबईतल्या हॉटेलात आलाय लष्करी थाट!
  • मुंबईतल्या हॉटेलात आलाय लष्करी थाट!
  • मुंबईतल्या हॉटेलात आलाय लष्करी थाट!
  • मुंबईतल्या हॉटेलात आलाय लष्करी थाट!
  • मुंबईतल्या हॉटेलात आलाय लष्करी थाट!
  • मुंबईतल्या हॉटेलात आलाय लष्करी थाट!
SHARE

आत्तापर्यंत मुंबईत आपण वेगवेगळ्या थीमचे अनेक रेस्टॉरंट पाहिले. पण मुंबईत लष्कर थीमवर आधारीत रेस्टॉरंटची कमतरता होती. पण आता ती कसर देखील भरून निघणार आहे. कारण लष्कर थीमवर आधारीत लाऊंज मालाडमध्ये सुरु झाला आहे. ३० मार्चला म्हणजेच शुक्रवारी 'आऊटपोस्ट' तुमच्या सेवेत दाखल झालं आहे.आऊटपोस्टची खासियत

तुम्हाला फुल्ल टू लष्करी वातावरण आऊटपोस्ट इथं अनुभवता येणार आहे. खाण्यापासून ते पिण्यापर्यंत सगळ्यामध्येच लष्करी थीमची एक झलक इथे दिसते. लष्करात रोज रात्री ड्रिंक करून इतर साथीदारांशी गप्पा मारण्याची परंपरा आहे. तीच स्टाईल आऊटपोस्ट लाऊंजमध्ये तुम्हाला अनुभवता येणार आहे.काय आहे ऑफर?

आऊटपोस्ट तुम्हाला भन्नाट ड्रिंक ऑफर करत आहे. रम आणि स्कॉचपासून बनवलेले 'मिलेक्ट्री ब्लड' आणि 'व्हिस्की टँगो फॉक्सट्रॉट' तुम्ही ट्राय करू शकता. याशिवाय 'कामिकेज मिशन' आणि 'एक्सप्लोजिव्ह मोजिटो' असे हटके ड्रिंक्स इथं उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या फ्लेवर्सचे कॉकटेल्स देखील तुम्ही ट्राय करू शकता. बी-५२ बॉम्बर, ग्रीस्ड बुलेट, रेस्टलेस सिविलियन, पंच आऊट, मॅगरिटा इन द कँप अशा कॉकटेल्सचा आस्वाद तुम्हाला इथे घेता येणार आहे.खाण्यामध्ये 'कर्नल सिंग का मनपसंद प्लॅटर' तुम्ही ट्राय करू शकता. याशिवाय रोल्स टू द रेस्क्यू, फौजी के हाथ की दालद बॅटल ऑफ द सॉस अशा वेगळ्या डिशेसचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. नॉनव्हेजमध्ये तुम्ही पापलेट तवा फ्राय, ऑयस्टर सॉसमधलं चिकन बर्न्ट गार्लिक, चिली बेजल फिश आणि कोळंबी तवा फ्राय अशा डिशेस तुम्ही ट्राय करू शकता. जर तुम्ही डाएटवर असाल, तर तुमच्यासाठी इथे वेगवेगळे सलाड आणि सूप देखील उपलब्ध आहेत.


कुठे - ७ वा मजला, सीनर्जी न्यायालय, कांचपाडा रोड, मालाड (.)हेही वाचा

'या' रेस्टॉरंटची भन्नाट ऑफर, फक्त 9 रुपयांत मिळणार सिगनेचर डिश!


संबंधित विषय