'या' रेस्टॉरंटची भन्नाट ऑफर, फक्त 9 रुपयांत मिळणार सिगनेचर डिश!

धडूम हे रेस्टॉरंट त्यांची सिगनेचर डिश प्युटाईनसाठी ओळखले जाते. मात्र, नवीन रेस्टॉरंटच्या शुभारंभानिमित्त खवय्यांसाठी त्यांनी एक खास ऑफर दिली आहे.

  • 'या' रेस्टॉरंटची भन्नाट ऑफर, फक्त 9 रुपयांत मिळणार सिगनेचर डिश!
SHARE

सेलिब्रिटी शेफ हरपाल सिंग सोखी मुलुंडमध्ये त्यांचं पहिलं रेस्टोरंट उघडणार आहेत. 'धडूम' असं त्यांच्या रेस्टॉरंटचं नाव आहे. मुंबईत त्यांचे तीन आऊटलेट आहेत. आता चौथं आऊटलेट ते मुलुंडमध्ये उघडणार आहेत. धडूम हे रेस्टॉरंट त्यांची सिगनेचर डिश प्युटाईनसाठी ओळखले जाते. मात्र, नवीन रेस्टॉरंटच्या शुभारंभानिमित्त खवय्यांसाठी त्यांनी एक खास ऑफर दिली आहे.


काय आहे ऑफर? 

रेस्टॉरंट लाँचच्या आनंदात धडूमतर्फे त्यांची सिगनेचर डिश 'प्युटाईन' फक्त ९ रुपयांमध्ये देण्यात येणार आहे. अवाक झालात ना? फक्त ९ रुपयांत आता तर साधा वडापावही येत नाही. मग धडूम रेस्टॉरंटतर्फे त्यांची सिगनेचर डिश कशी काय देणार? पण हे खरं आहे. तुम्हाला विश्वास बसत नसेल, तर ३० मार्चला तुम्ही दुपारी २ ते रात्री ९ दरम्यान रेस्टॉरंटला भेट देऊ शकता.धडूम रेस्टॉरंटची खासियत 

प्युटाईन या त्यांच्या सिगनेचर डिशशिवाय फ्राईज ओके प्लीज, कुंग फू पांडा पोटॅटो टॉरेडो, पनीर चिली फ्राईज, ओरिओ पकोडाज आणि किलर बर्गर असे अनेक पदार्थ तुम्ही ट्राय करू शकता. पण हे पदार्थ तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार नाहीत.


सो तुम्हाला काही तरी वेगळं ट्राय करायचं असेल, तर नक्की धडूम या नवीन रेस्टॉरंटला भेट द्या. अधिक माहितीसाठी त्यांच्या फेसबुक पेजलाही तुम्ही भेट देऊ शकता.

कधी - 30 मार्च
वेळ - दुपारी 2 ते रात्री 9
कुठे - शॉप नंबर 8, गोल्डन विलोज, वसंत गार्डन, मुलुंड (प.)हेही वाचा

तुम्ही 'चीझ टी' ट्राय केलीत का?


संबंधित विषय
ताज्या बातम्या