Advertisement

पान खायची आवड आहे? मग तुम्ही इथे यायलाच हवं!

इथं तुम्हाला पानाचे १-२ नाही, तर १० ते १५ फ्लेवर्स खाता येणार आहेत. एखाद्या पुरचुंडीसारखं बांधलेलं त्रिकोणी आकाराचं पान, त्यावर खोचलेली एक लालबुंद चेरी...कधी ऐकलेही नसतील असे फ्लेवर्स तुम्हाला खाता येणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तंबाकू मुक्त हे पान असल्यानं लहान मुलांपासून ते आबाल वृद्धांपर्यंत सर्वच वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या पानांचा आनंद घेऊ शकतात.

पान खायची आवड आहे? मग तुम्ही इथे यायलाच हवं!
SHARES

तर कोणत्याही देशातल्या खाद्यसंस्कृतीमध्ये न सापडणारा आणि फक्त भारतीय खाद्यसंस्कृतीत असलेला पदार्थ म्हणजे पान! जेवणानंतर या पानाची साथ मिळाली की, जेवणाची मजा दुपटीनं वाढते! पण हे पान जमवताना काही गमतीजमती करता आल्या तर? तुमच्यासाठी अशाच गमतीदार पानांचे फ्लेवर्स 'इथे' मिळणार आहेत.



पाली हिल इथल्या 'लिवॅसन्स' इथं तुम्हाला पानाचे १-२ नाही, तर १० ते १५ फ्लेवर्स खाता येणार आहेत. एखाद्या पुरचुंडीसारखं बांधलेलं त्रिकोणी आकाराचं पान, त्यावर खोचलेली एक लालबुंद चेरी... या पानाची खरी गंमत येते ती ते खाल्ल्यावर! कारण पान खाल्ल्यानंतर तुम्हाला साक्षात्कार होतो की या पानात असं बरच काही आहे, ज्याचा अनुभव तुम्ही याआधी कधीच घेतलेला नाही.



लिवॅसन्स यांच्या पानाची खासियत

आत्तापर्यंत कलकत्ता मीठा पान, बनारसी पान, गोड पानसाधं पान असे तीन चार प्रकार आपल्या सर्वांनाच माहिती असतील. पण पाली हिलच्या 'लिवॅसन्स' इथल्या पानाच्या शॉपमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवर्सचे पान खाता येतील. कधी ऐकलेही नसतील असे फ्लेवर्स तुम्हाला खाता येणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तंबाकू मुक्त हे पान असल्यानं लहान मुलांपासून ते आबाल वृद्धांपर्यंत सर्वच वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या पानांचा आनंद घेऊ शकतात.




कोणते फ्लेवर्स ट्राय करू शकता?

ब्राऊनी हा प्रकार आपण असाच किंवा आईस्क्रिमसोबत खाल्ला असेल. पण इथं तुम्हाला ब्राऊनी आणि चॉकोचिप्स पानाच्या आत स्टफ करून दिलं जातं. 'बॉम्बे ब्राऊनी' असं नाव त्यांनी या पानाला दिलं आहे. जिभेवर या पानाची चव किती तरी वेळ रेंगाळत राहते. त्यानंतर 'बॉम्बे वेलवेट' हा फ्लेवर देखील मस्त आहे. यामध्ये गुलकंद आणि लाल वेलवेट म्हणजेच केक स्टफ केलेले असते.



'किम इट फॅरो' या पानात हॅझलनट आणि वेफर बॉल स्टफ केलेले आहे. याशिवाय ओह ओरीओ, चोको रॉकेट, कोकोनट चॉकलेट, चॉकलेट मार्शमॅलो, कॅरेमल, सही है पानजयपूर स्पेशल  अशा अनेक फ्लेवर्समध्ये तुम्ही पान खाऊ शकता.



विशेष म्हणजे हे पान तुम्ही ऑनलाईन देखील ऑर्डर करू शकता. अधिक माहितीसाठी त्यांच्या फेसबुक पेजला देखील भेट देऊ शकता.  


 

पूर्वी गल्लीच्या कोपऱ्यात एखाद दुसरी पानाची टपरी असायची. आता त्या टपऱ्या नाही अशातला भाग नाही. पण त्यांचं रूप आता पालटलं आहे. चुना आणि कात लावलेल्या पानांची जागा आता वेगवेगळ्या फ्लेवर्सनी घेतली आहे. यालाच म्हणतात खाद्यसंस्कृतीची क्रांती!



कुठे - शॉप ३, बनारसी अपार्टमेंट, 30thरोड, पाली हिल, वांद्रे (), मुंबई



हेही वाचा

१०० प्रकारचे पॉपकॉर्न कधी खाल्लेत का?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा