Advertisement

१०० प्रकारचे पॉपकॉर्न कधी खाल्लेत का?

पॉपकॉर्नचे १०० फ्लेव्हर आहेत असं जर तुम्हाला सांगितलं तर? तुमचा विश्वास बसत नसेल. पण हे खरं आहे. दक्षिण मुंबईतल्या नळ बाजार इथं 'शाम फास्ट फुड'मध्ये तुम्हाला १०० फ्लेव्हरचे पॉपकॉर्न खायला मिळतील.

१०० प्रकारचे पॉपकॉर्न कधी खाल्लेत का?
SHARES

ढई असो वा मशीन, पण तापल्यावर पॉप पॉप आवाज करत फुलणारा हा पदार्थ कुठला? खरंतर त्यांच्या टणाटण उड्यांमध्येच या पदार्थाचं नाव लपलं आहे. लक्षात येतंय का? मी कुठल्या पदार्थाबद्दल बोलतेय ते? आम्ही बोलत आहोत टणाटण उड्या मारणाऱ्या 'पॉपकॉर्न्स' बद्दल! लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या पसंतीस उतरणारा हा पदार्थ.




पॉपकॉर्नला जगातलं सर्वात लोकप्रिय स्नॅक्स म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चित्रपट पाहताना असो वा संध्याकाळी चहाच्या वेळी, बागेत असो वा गप्पा मारताना असो. पॉपकॉर्न प्रत्येक वेळेसाठी आणि वातावरणासाठी एकदम झकास स्नॅक्स आहे, याबाबत काही दुमत नाही!



सर्वांच्या फेव्हरेट अशा या पॉपकॉर्नचे दोन-तीन फ्लेवर सर्वांनाच माहीत असतील. सॉल्टी, कॅरेमल आणि चीझ हे तीन फ्लेव्हर एकदा का होईना, पण प्रत्येकाने चाखलेच असतील. पण पॉपकॉर्नचे १०० फ्लेव्हर आहेत असं जर तुम्हाला सांगितलं तर? तुमचा विश्वास बसत नसेल. पण हे खरं आहे. दक्षिण मुंबईतल्या नळ बाजार इथं 'शाम फास्ट फुड'मध्ये तुम्हाला १०० फ्लेव्हरचे पॉपकॉर्न खायला मिळतील.



कुठल्या फ्लेवरचे पॉपकॉर्न?

सॉल्टी, कॅरेमल आणि चीझ या व्यतिरिक्त तुम्हाला इथं १०० फ्लेव्हरचे पॉपकॉर्न ट्राय करता येतील. क्लासिक सॉल्टेड ते चिली चीझपर्यंत सर्व फ्लेव्हर तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आणतील. त्यांच्याकडे असलेले पाणीपुरी फ्लेव्हर, पुदिना फ्लेव्हर, क्रीम अॅण्ड ऑनियन फ्लेव्हर, अॅलिपिनो, मिंट फ्लेव्हर पॉपकॉर्न नक्की ट्राय करा. याशिवाय नाचोस, अमेरिकन चॉपसी, सिजलिंग बार्बिक्यू, पिझ्झा आणि चॉकलेट यासारखे हटके फ्लेव्हर देखील त्यांच्याकडे आहेत. या पॉपकॉर्नवर टाकण्यात येणाऱ्या मसाल्यांमुळे ते अधिक चविष्ट होतात.



हेही वाचा : नॉन-व्हेज, चॉकलेट आणि टेस्ट ट्यूब पाणीपुरी! चाखायची असेल तर इथे या!


माफक दरात पॉपकॉर्नची विक्री

तुम्हाला हवे असतील, तर तुमच्या समोर पॉपकॉर्न बनवून दिले जातात. तुम्ही मिक्स मॅच फ्लेव्हरमध्ये म्हणजे दोन-तीन फ्लेव्हर मिक्स करून देखील पॉपकॉर्न घेऊ शकता. विशेष म्हणजे या वेगवेगळ्या फ्लेव्हरच्या पॉपकॉर्नसाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत. पॉपकॉर्नच्या एका पाकिटाची किंमत ५० रुपये आहे. जर तुम्हाला देखील काही वेगळं ट्राय करायचं असेल तर शाम फास्ट फूडला नक्की भेट द्या. नळ बाजार इथल्या फूल गली मस्जिद जवळील लेहरी मंजिल शॉप १-बी इथं श्याम फास्ट फूड सेंटर आहे.



हेही वाचा

खवय्ये असाल तर एका बैठकीत ही थाळी संपवून दाखवा!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा