विघ्नेश दक्षिणामूर्ती मुंबई सिटी एफसीशी करारबद्ध

इंडियन सुपर लीगच्या (अायएसएल) अागामी मोसमासाठी मुंबई सिटी एफसीने भारताचा २३ वर्षांखालील संघाचा फुटबाॅलपटू विघ्नेश दक्षिणामूर्ती याला करारबद्ध केले. मुंबई सिटीने या मोसमासाठी करारबद्ध केलेला हा अखेरचा खेळाडू ठरला अाहे. बंगळुरूचा दक्षिणामूर्ती हा अोझोन अकादमीचा खेळाडू असून वयाच्या १७व्या वर्षीच त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे खुले झाले होते. त्यानंतर विघ्नेश हा विविध वयोगटातील भारतीय संघाचा अाधारस्तंभ मानला जात अाहे. अलीकडेच ढाका इथं झालेल्या सॅफ सुझुकी फुटबाॅल चषक स्पर्धेत त्याने भारताच्या २३ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

कुटुंब रंगलंय फुटबाॅलमध्ये

विघ्नेश दक्षिणामूर्तीचं संपूर्ण कुटुंब जणू फुटबाॅल खेळाशी निगडित अाहे. त्याचे काका ईस्ट बंगाल अाणि मोहन बागान या दिग्गज क्लबकडून खेळले अाहेत. त्याचा मोठ भाऊ डेन्मार्क इथे सराव शिबिरासाठी गेला होता. अाता अायएसएलमध्ये विघ्नेशचा जलवा पाहायला मिळणार अाहे. अायएसएलच्या या मोसमाच्या पर्वाला २९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार अाहे.

विघ्नेशवर अामचा पूर्णपणे भरवसा अाहे. तो युवा अाणि गुणी खेळाडू असून त्याने अातापर्यंत सर्वांच्याच अपेक्षा पूर्ण केल्या अाहेत. मुंबई सिटी एफसी कुटुंबात त्याचे स्वागत करण्यासाठी अाम्ही अानंदी अाहोत.

- इंद्रनिल दास ब्ला, मुंबई सिटी एफसीचे सीईअो


हेही वाचा -

हाॅकी वर्ल्डकप जिंकण्याची भारतीय संघात क्षमता - धनराज पिल्ले

मुंबईत रंगणार इंडो इंटरनॅशनल प्रीमिअर कबड्डी लीग


पुढील बातमी
इतर बातम्या