SHARE

१९७५ साली भारतीय संघाने अखेरचा वर्ल्डकप जिंकला. त्यानंतर जवळपास ४३ वर्षे झाली तरी वर्ल्डकपने भारताला नेहमीच हुलकावणी दिली अाहे. यंदा २८ नोव्हेंबरपासून भारतातच भुवनेश्वर येथे हाॅकी वर्ल्डकप होत अाहे. सध्याच्या भारतीय संघात सिनियर अाणि ज्युनियर खेळाडूंचा भरणा अाहे. या टीममध्ये वर्ल्डकप जिंकण्याची क्षमता अाहे, असे उद्गार भारताचे महान हाॅकीपटू धनराज पिल्ले यांनी काढले. मुंबईत ट्रायडंट हाॅटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय हाॅकी संघाची जर्सी लाँच करण्यात अाली.


हरेंद्र सिंग सर्वोत्तम कोच

सध्या भारतीय संघाची कमान ही हरेंद्र सिंग यांच्यावर अाहे. हरेंद्र सिंग हे सध्या भारतातील सर्वोत्तम प्रशिक्षकांमध्ये एक अाहेत. गेले चार महिने त्यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारतीय खेळाडू जीव अोतून मेहनत घेत अाहेत. अाता पुढील दोन महिने भारतीय संघाला कसून मेहनत घ्यावी लागेल. तरच विश्वविजयाचे स्वप्न साकार होऊ शकेल, असेही धनराज यांनी सांगितले.


टार्गेट जितना है

देशात हा वर्ल्डकप होणार असल्यामुळे भारतीय संघावर मोठी जबाबदारी असणार अाहे. मात्र दडपणाखाली खेळ कसा उंचावता येईल, हे तंत्र त्यांनी अात्मसात करावे. मैदानावर हा संघ सर्वोत्तम कामगिरी करू शकतो. तितकी क्षमता या संघात नक्कीच अाहे. सध्याचा भारतीय संघ हा सर्वोत्तम, विकसित असा अाहे. अनेक पदक विजेते खेळाडू या संघात अाहेत. टार्गेट जितना है, इतकंच लक्षात ठेवून त्यांनी अापली सर्वोत्तम कामगिरी करायला हवी, असं मत महान हाॅकीपटू अजित पाल सिंग यांनी व्यक्त केलं.संबंधित विषय
ताज्या बातम्या