Advertisement

मुंबईत रंगणार इंडो इंटरनॅशनल प्रीमिअर कबड्डी लीग


मुंबईत रंगणार इंडो इंटरनॅशनल प्रीमिअर कबड्डी लीग
SHARES

न्यू कबड्डी फेडरेशन अाॅफ इंडियाने (एनकेएफअाय) कबड्डी या भारतीय खेळाचा अांतरराष्ट्रीय स्तरावर अधिकाधिक प्रसार होण्यासाठी इंडो इंटरनॅशनल प्रीमिअर कबड्डी लीगच्या अायोजनाची घोषणा केली अाहे. लवकरच मुंबईत रंगणाऱ्या या लीगचे थेट प्रसारण डिस्कव्हरी कम्युनिकेशन्स इंडियाच्या डीस्पोर्ट या क्रीडा वाहिनीवर केले जाणार अाहे.


असे असेल स्वरूप

या लीगमध्ये अाठ संघांचा समावेश असेल अाणि जवळपास दीड महिना रंगणाऱ्या या स्पर्धेत ६२ सामने खेळविण्यात येतील. प्रत्येक संघात ३-४ परदेशी खेळाडूंचा सहभाग असेल. न्यूझीलंड, पोलंड, अर्जेंटिना, टांझानिया, अाॅस्ट्रेलिया, नाॅर्वे, ब्रिटन, कॅनडा, अमेरिका, अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण, बांगलादेश, श्रीलंका, मेक्सिको, केनिया, माॅरिशस, इराक, डेन्मार्क अाणि अन्य देशांतील कबड्डीपटूंवर बोली लावण्यात येईल.


अशी झाली एनकेएफअायची स्थापना

अनेक माजी खेळाडू तसेच अर्जुन पुरस्कार विजेते एकत्र अाल्यानंतर त्यांनी इंडो इंटरनॅशनल प्रीमिअर कबड्डी लीगच्या अायोजनासाठी न्यू कबड्डी फेडरेशन अाॅफ इंडियाची (एनकेएफअाय) स्थापना केली. अाशियाई स्पर्धेत दोन वेळा सुवर्णपदक पटकावणारे महान कबड्डीपटू एस. राजारथिनम, वर्ल्डकपमधील सुवर्णपदक विजेते सुरेश कुमार, अाशियाई स्पर्धेतील डबल चॅम्पियन अाणि सॅफ स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते मुरुगनाथम, चार वेळा राष्ट्रीय विजेते मधुकर यादव तसेच मलेशियन अोपन चॅम्पियन सी. होनप्पा यांच्यासह अनेक खेळाडू अाणि सेलिब्रेटी या लीगच्या अायोजनासाठी पुढे अाले अाहेत.


हेही वाचा -

वर्ल्डकप कॅरममध्ये प्रशांत मोरे, काजल कुमारीची कमाल

माजी क्रिकेटपटूंनाही मिळणार एमसीएत मतदानाचा हक्कसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा