Advertisement

माजी क्रिकेटपटूंनाही मिळणार एमसीएत मतदानाचा हक्क


माजी क्रिकेटपटूंनाही मिळणार एमसीएत मतदानाचा हक्क
SHARES

विविध क्लबच्या सिनियर प्रतिनिधींकडून अालेल्या अनेक सूचनांचा अादर राखत मुंबई क्रिकेट असोसिएशनचा कारभार पाहणाऱ्या प्रशासकीय समितीने (सीअोए) कार्यकारी समितीच्या सदस्यांसोबत सोमवारी बैठकीचं अायोजन केलं होतं. त्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनची सुधारित घटना एमसीएच्या अधिकृत संकेतस्थळावर टाकण्यात अाली अाहे. या सुधारित घटनेनुसार, अाता एमसीएच्या मतदानादरम्यान मुंबईतील माजी अांतरराष्ट्रीय खेळाडूंना मतदानाचा हक्क मिळणार अाहे. मुंबईत जवळपास ७५ पेक्षा माजी अांतरराष्ट्रीय खेळाडू असून त्यांच्यामुळे अाता एमसीएच्या निवडणुकीत खरी चुरस रंगणार अाहे.


खेळाडूंनाही कार्यकारिणीत संधी

बीसीसीअायच्या घटनेनुसार, एमसीएची घटना तयार करण्यात अाली असून अाता एमसीएच्या कार्यकारिणीत खेळाडूंनाही संधी मिळणार अाहे. एक पुरुष अाणि एका महिला क्रिकेटपटूला ही संधी मिळेल. हे क्रिकेटपटू सर्व खेळाडूंचे प्रतिनिधित्व करतील अाणि त्यांना प्लेयर्स असोसिएशनची मान्यता लाभेल. बोगस मतदान रोखण्यासाठीही क्लबच्या प्रतिनिधींनी एमसीएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्याचं बंधनकारक करण्यात अालं अाहे.


सर्वोच्च न्यायालय या घटनेवर अंतिम शिक्कामोर्तब करणार अाहे. तूर्तास ही घटना एमसीएच्या संकेतस्थळावर टाकण्यात अाली अाहे. त्याबाबत येणाऱ्या सूचनांवर विचार करण्यात येईल. शुक्रवारी ७ सप्टेंबरपर्यंत ही घटना अंतिम स्वरूपात तयार करावयाची असून सदस्यांना अापल्या सूचना मांडण्याची अखेरची संधी देण्यात अाली अाहे.
- एमसीएचे पदाधिकारी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा