Advertisement

वर्ल्डकप कॅरममध्ये प्रशांत मोरे, काजल कुमारीची कमाल


वर्ल्डकप कॅरममध्ये प्रशांत मोरे, काजल कुमारीची कमाल
SHARES

दक्षिण कोरिया येथील सोंगम स्पोर्टस टाऊनमध्ये रंगलेल्या पाचव्या कॅरम वर्ल्डकप स्पर्धेत भारताच्या अाणि मुंबईच्या प्रशांत मोरे याने भारताचाच कर्णधार रियाझ अकबर अली याचा तीन सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात २५-५, १९-२५, २५-१३ असा पराभव करून सुवर्णपदकावर नाव कोरले. याच गटात भारताच्या झहीर पाशाने श्रीलंकेच्या माजी विश्वविजेत्या निसांथा फर्नांडोला १७-१६, २५-० अशी सरळ दोन सेटमध्ये धूळ चारत कांस्यपदकाची कमाई केली.


काजल कुमारी रौप्यपदकाची मानकरी

महिलांच्या एकेरी गटात भारताची एस. अपूर्वा विजयी ठरली. तिने अंतिम सामन्यात मुंबईची कडवी प्रतिस्पर्धी काजल कुमारी हिचा २५-५, २५-१४ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. उपांत्य सामन्यात काजलने अापलीच सहकारी आयेशा मोहम्मदला २५-९, २५-२१ असे तर अपूर्वाने रश्मी कुमारीला २५-१२, १८-२५, २५-३ असे पराभूत केले होते. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीमध्ये मुंबईच्या आयेशा मोहम्मदने रश्मी कुमारीला ५-२५, २५-१७, २५-१० असे तीन सेटमध्ये पराभूत करत कांस्यपदक पटकावले.


दुहेरीत प्रशांत-रियाझची बाजी

पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात रियाझ अकबर अलीने प्रशांत मोरेच्या साथीने भारताच्या झहीर पाशा व सगायभारती जोडीवर १०-२५, २५-४, २५-८ असा विजय मिळविला. श्रीलंकेच्या निसांथा फर्नांडो-चामील कुरे यांनी कांस्यपदक पटकावले. महिला दुहेरीत रश्मी कुमारी व अायेशा मोहम्मद यांनी एस. अपूर्वा-काजल कुमारी यांच्यावर २-२५, २५-७, २२-२० अशी मात करून सुवर्णपदक पटकावले.


हेही वाचा -

माजी क्रिकेटपटूंनाही मिळणार एमसीएत मतदानाचा हक्क

रवी शास्त्रींच्या अायुष्यात अाली 'ही’ अभिनेत्री?संबंधित विषय
Advertisement