वन रुपी क्लिनिकच्या कामगिरीने केंद्र सरकार खूश, म्हणूनच घेतला 'हा' निर्णय!

  • मुंबई लाइव्ह टीम & राजश्री पतंगे
  • आरोग्य

मुंबईकरांना एक रुपयात वैद्यकीय सेवा देणाऱ्या वन रुपी क्लिनिक या संकल्पनेला प्राधान्य देत ती व्यापक स्तरावर राबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आतापर्यंत ही सेवा मुंबईच्या २० रेल्वे स्थानकांवर दिली जात आहे. वन रुपी क्लिनिकच्या धर्तीवर आता मुंबईसह देशभरातील ७००० रेल्वे स्थानकांवर अशा प्रकारची आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती वन रुपी क्लिनिकचे संचालक राहुल घुले यांनी दिली.

२०१९ पर्यंत देशभरातील १००० रेल्वे स्थानकांवर वन रुपी क्लिनिक सुरू करण्यासाठी केंद्र सरकार जागा उपलब्ध करून देणार आहे. याशिवाय ७००० रेल्वे स्थानकांवर वन रुपी सारखी आरोग्य सेवा सुरू करण्यासाठी केंद्र सरकार इच्छुक संस्थांना जागा उपलब्ध करून देणार आहे.

डॉ. राहुल घुले, संचालक, वन रुपी क्लिनिक

जर देशात ७००० रेल्वे स्थानकांवर अशा प्रकारची आरोग्य सेवा सुरू झाली तर दिवसाला ७ लाख रुग्णांना त्वरीत उपचार मिळण्यास मदत होईल, असंही राहुल घुले म्हणाले.

मुंबईतील या स्थानकांवर ही सेवा सुरू

१० मे २०१७ रोजी 'वन रुपी क्लिनिक' सेवा मध्य रेल्वेवरील काही महत्त्वाच्या स्थानकांवर सुरू केली. सध्या दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, मुलुंड, वडाळा रोड, वाशी, मानखुर्द या ८ स्थानकांवर ही सेवा उपलब्ध आहे. तर सायन, विक्रोळी, कळवा, मुंब्रा, दिवा आदी रेल्वे स्थानकांचा वन रुपी क्लिनिक सेवेच्या यादीत समावेश आहे.


हेही वाचा 

४० हजार रुग्ण, २ कोटींची बचत - वन रुपी क्लिनिकची कामगिरी!

पुढील बातमी
इतर बातम्या