Advertisement

रेल्वे स्थानकांवरील 'वन रुपी क्लिनिक' सुरुच राहणार


रेल्वे स्थानकांवरील 'वन रुपी क्लिनिक' सुरुच राहणार
SHARES

दोन दिवसांपूर्वी मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवरील 'वन रुपी क्लिनिक' ही वैद्यकीय सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र रेल्वे प्रशासनाबरोबर झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

काही रेल्वे अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून मध्य रेल्वे स्थानकांवरील क्लिनिक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण, मंगळवारी 'वन रुपी क्लिनिक'चे प्रमुख डॉ. राहुल घुले, मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रवींद्र गोयल, मेडिकल डिपार्टमेंटचे डॉ. अजय कुमार तसंच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक झाली. या बैठकीत 'वन रुपी क्लिनिक'ला समाजकंटकांपासून सुरक्षा देण्यासह आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता करण्याचं आश्वासन रेल्वेकडून देण्यात आलं.


आणखी ११ ठिकाणी सेवा

बैठकीत 'वन रुपी क्लिनिक' सेवेला रेल्वे प्रशासनाने पाठिंबा दर्शविल्याचे डॉ. राहुल घुले यांनी सांगितलं. तसंच जागेवरून सुरू असलेला वाद आता मिटला असून ठरल्याप्रमाणं आणखी ११ ठिकाणी ही आपत्कालीन सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे जागा देणार असल्याचंही डॉ. घुले यांनी स्पष्ट केलं.

पुढील ३ ते ४ महिन्यांत सर्वच निश्चित ठिकाणांवर 'वन रुपी क्लिनिक' सेवा सर्वसामान्यांसाठी खुली होईल. तसंच सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत मध्य रेल्वेच्या भायखळा आणि भांडुप रेल्वे स्थानकांवर प्रशासन क्लिनिकला जागा देईल, असंही त्यांनी सांगितलं.


आपत्कालीन उपचार देण्यासाठी रेल्वे स्थानकांवर 'वन रुपी क्लिनिक' सुरू करण्यात आले होते. रेल्वेने सकारात्मक पाठिंबा दिल्यानं पुन्हा एकदा नव्या उत्साहाने ही सेवा आम्ही रुग्णांना पुरवणार आहोत.
- डॉ.राहुल घुले, प्रमुख, वन रुपी क्लिनिक


रेल्वे प्रशासन आणि 'मॅजिक दिल' संस्थेने मिळून १० मे रोजी 'वन रुपी क्लिनिक' सेवा मध्य रेल्वेवरील काही महत्त्वाच्या स्थानकांवर सुरू केली. सध्या दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, मुलुंड, वडाळा रोड, वाशी, मानखुर्द आदी ८ स्थानकांवर ही सेवा उपलब्ध आहे. तर सायन, विक्रोळी, कळवा, मुंब्रा, दिवा आदी रेल्वे स्थानकांचा वन रुपी क्लिनिक सेवा यादीत समावेश आहे.

परंतु, मधल्या काळात रेल्वे प्रशासन आणि मॅजिक दिल संस्थेत जागेवरून वाद विकोपाला गेल्यानं हे क्लिनिक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळं मुंबईतल्या झोपडपट्टीत नव्यानं क्लिनिक सुरू करणार अशी माहिती डॉ. घुले यांनी दिली होती.



हे देखील वाचा -

वन रुपी क्लिनिक सेवा का होणार बंद?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा