Advertisement

वन रुपी क्लिनिक सेवा का होणार बंद?


वन रुपी क्लिनिक सेवा का होणार बंद?
SHARES

आपत्कालीन रुग्णांना फक्त एक रुपयांत वैद्यकीय सेवा देणारे वन रुपी क्लिनिक येत्या 3 दिवसांत बंद होणार आहे. काही समाजकंटकांच्या त्रासाला कंटाळून वन रुपी क्लिनिक बंद करण्याचा निर्णय वन रुपी क्लिनिकचे प्रमुख डॉ. राहुल घुले आणि त्यांच्या पथकाने घेतला आहे.

रेल्वे प्रशासनाचा अंतर्गत वाद आणि राजकीय हस्तक्षेपाचा परिणाम हा क्लिनिकवर होत होता. पण, हा प्रकल्प रेल्वे स्थानकांऐवजी झोपडपट्ट्यांच्या भागात चालवणे योग्य राहिल,  असेही डॉ. राहुल घुले यांनी स्पष्ट केले आहे.


मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांवर मिळत होती सेवा

वन रुपी क्लिनिकची सेवा मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांवर मिळत होती. पण, रेल्वे प्रशासनाच्या अंतर्गत वादामुळे याआधीही दादरमधील वन रुपी क्लिनिक तोडण्यात आले होते. पण, लगेचच ही सेवा पूर्ववत करण्यात आली होती. क्लिनिकचे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगत हे बांधकाम पाडण्यात आले होते. त्याचप्रमाणे, अंबरनाथ येथील क्लिनिकच्या जागेबाबत हस्तक्षेप केल्यामुळे हा नवा वाद उद्भवला आहे. अंबरनाथ रेल्वे स्टेशनबाहेरील केंद्राच्या उभारणीस काही स्थानिक गुंडांनी आक्षेप घेतला आहे.


रेल्वे प्रशासनाला पत्राद्वारे कळवला निर्णय

मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यांना तक्रारीचे पत्र लिहून हा निर्णय त्यांनी रेल्वे प्रशासनाला कळवला आहे. या पत्रात रेल्वे अधिकाऱ्यांच्या वादामुळे दादरमधील क्लिनिकच्या फार्मसीचे जून महिन्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. शिवाय, नव्याने 11 स्थानकांवर सुरू होणाऱ्या क्लिनिकसाठी 19 लाख रुपयांची रक्कमही रेल्वेला देण्यात आल्याचे डॉ. घुले यांनी पत्रात लिहले आहे.

मे महिन्यात सुरू करण्यात आलेल्या या सेवेमुळे जवळपास 20 हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्याशिवाय आपत्कालीन परिस्थितीतील 200 रुग्णांवर या क्लिनिकने सेवा दिली आहे. पण, रेल्वे प्रशासनाचा वाद आणि राजकीय हस्तक्षेपामुळे वन रुपी क्लिनिकवर याचा परिणाम होत आहे. म्हणून आम्ही हे क्लिनिक्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.  

- डॉ. राहुल घुले, प्रमुख, वन रुपी क्लिनिक

बांधकाम अधिकृत असूनही किंवा परवानगी असूनही काही स्थानिक गुंड आणि बडे राजकीय नेत्यांमुळे बऱ्याचदा रेल्वे प्रशासन या क्लिनिकच्या जागा बदलत असल्याचे निदर्शनास आल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. पण, ही सेवा जरी रेल्वेस्थानकांवर नसली तरी झोपडपट्ट्यांच्या भागात उपलब्ध करून देणार असल्याचे डॉ. राहुल घुले यांनी स्पष्ट केले आहे.


वन रुपी क्लिनिक बंद करण्यामागची मुख्य कारणे

  • परिसरातील वैद्यकीय लॅब, औषध कंपन्यांच्या नफ्यावर गदा येत असल्याच्या धमक्या
  • रेल्वेस्टेशनबाहेरील केंद्राच्या उभारणीस काही स्थानिक गुंडांचा आक्षेप
  • सेवेवरील परिणाम टाळण्यासाठीचा निर्णय
  • समाजकंटकांच्या त्रासाला कंटाळून घेतला निर्णय

हेही वाचा - 

घाटकोपर स्थानकावर महिलेची प्रसुती, 'वन रुपी क्लिनिक'मध्ये त्वरीत उपचार

'वन रुपी क्लिनिक'मध्ये मलेरिया, डेंग्यूची चाचणी 500 रुपयांत


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा