'वन रुपी क्लिनिक'मध्ये मलेरिया, डेंग्यूची चाचणी 500 रुपयांत

 Mumbai
'वन रुपी क्लिनिक'मध्ये मलेरिया, डेंग्यूची चाचणी 500 रुपयांत
Mumbai  -  

पावसाळ्याच्या आगमनाबरोबरच साथीच्या आजारांनी देखील डोके वर काढले आहे. साथीच्या आजारांच्या रुग्णांत वाढ होत असल्याने 'वन रुपी क्लिनिक'मध्ये मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो आणि लेप्टोचे निदान करणाऱ्या चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत.

खासगी रुग्णालयात या आजारांच्या चाचण्यांसाठी रुग्णांना 800 ते 1,200 रुपये मोजावे लागतात. त्या तुलनेत 'वन रुपी क्लिनिक'मध्ये अवघ्या 500 रुपयांत साथीच्या रोगांवरील चाचण्या उपलब्ध आहेत. 'वन रुपी क्लिनिक' ही संकल्पना सुरू होऊन एक महिना झाला असून, या मोहिमेला रुग्णांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. सध्या या क्लिनिकमध्ये येणाऱ्यांपैकी साथीच्या आजाराच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आतापर्यंत डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो आणि लेप्टोचे प्रत्येकी एक रुण आढळल्याचे घाटकोपरच्या 'वन रुपी क्लिनिक'चे डॉ. राहुल घुले यांनी सांगितले.

Loading Comments