ठाणे महापालिका क्षेत्रात रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांसाठी खाटा कमी पडू नयेत म्हणून ठाण्यातील ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून 1 हजार खाटांचं कोरोना रुग्णालय उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय मुंब्रा येथील महापालिकेच्या मौलाना अबुल कलाम आझाद क्रीडा संकुलातही म्हाडाच्या माध्यमातून 1 हजार खाटांचं कोरोना रुग्णालय उभारण्यात येणार आहे.
मुंब्रा येथील या रुग्णालयात ऑक्सिजनची सुविधा असलेल्या ५०० खाटा असतील. त्याचबरोबर १०० खाटांचं आयसीयू युनिटही तयार करण्यात येणार आहे. मुंब्रा परिसरात निर्माण होणाऱ्या या रुग्णालयामुळे परिसरातील रुग्णांची मोठी सोय होणार असल्याचे पालकमंत्री शिंदे सांगितले. तर या रुग्णालयामुळे कळवा, मुंब्रा, कौसा आणि दिवा परिसरातील कोरोनाबाधित रुग्णांना दिलासा मिळणार असल्याचं गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी सांगितले.
हेही वाचा -
रेल्वे प्रवासी पासचा कालावधी वाढवून देण्याची प्रवासी संघटनेची मागणी
मुंबईच्या दिशेनं चक्रिवादळ, काय कराल आणि काय नाही?