पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी १०२ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी ( २६ नोव्हेंबर) १०२ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ७५ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच नवीन पनवेल येथील एका मृत्यूची नोंद झाली आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ८, नवीन पनवेल ११,  खांदा काॅलनी ५, कळंबोली २०, कामोठे २३, खारघर ३०, तळोजा येथील ५ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल १४, नवीन पनवेल १२, कळंबोली ५, कामोठे १८, खारघर येथील २६ १ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २५०८८ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २३९१६ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५७६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ५९६ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 

दिवाळीच्या काळात जमाव जमविणे, मास्क न घालणे, सामाजिक अंतर न पाळणे यामुळे कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे. नागरिकांनी दिवाळीत पालिकेच्या निर्देशांचे पालन केल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे.


हेही वाचा

पालिकेनं NFDC सोबतचा ‘हा’ करार मोडला

26/11 Attack : कसाबविरोधात साक्ष देणाऱ्या 'तिला' न्याय कधी मिळणार?


पुढील बातमी
इतर बातम्या