Advertisement

पालिकेनं NFDC सोबतचा ‘हा’ करार मोडला

मुलांसाठी बनवण्यात येणारा थिएटरचा प्रस्ताव राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाकडून (NFDC) मागे घेण्यात आला आहे.

पालिकेनं NFDC सोबतचा ‘हा’ करार मोडला
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)नं जाहीर केलं आहे की, मुलांसाठी बनवण्यात येणारा थिएटरचा प्रस्ताव राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाकडून (NFDC) मागे घेण्यात आला आहे. पाच वर्षांपूर्वी वांद्रे पश्चिमेकडिल जागेवर पालिका प्रशासनानं NFDCशी भैगिदारी करत सांस्कृतिक केंद्र उभारण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

पालिकेनं म्हटलं आहे की, एनएफडीसीनं दोन एजन्सींच्या स्वाक्षर्‍या केलेल्या सामंजस्य करार (एमओयू)चं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे आम्ही सास्कृतिक केंद्र उभारण्यासाठी दुसऱ्या संस्थांना विचारणा करणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव पालिकेच्या सुधार समितीसमोर ठेवण्यात आला होता. सध्या अंतिम मंजुरी प्रलंबित आहे. समितीनं यासंदर्भात एक संक्षिप्त चर्चा केली आणि अंतिम निर्णय घेण्यापूर्वी थिएटरच्या ठिकाणी भेट देण्याचं ठरवलें.

पालिकेनं एनएफडीसीबरोबर सामंजस्य करारातील सहा कथित उल्लंघनांची यादी दिली आहे. सध्याच्या मुलांच्या नाट्यगृहाच्या नूतनीकरणानंतर तसंच प्रकल्प वेळेवर पूर्ण न केल्यानं झालेलं नुकसान, एनएफडीसीने सांस्कृतिक केंद्रावर काम करण्यास दिलेला नकार अशी यादी दिली आहे. पुढे, नागरी संस्थेनं म्हटलं आहे की, प्रकल्पाच्या सल्लागार समितीत पालिका प्रतिनिधीचा समावेश न करणं देखील सामंजस्य कराराचा भंग होता.

महानगरपालिकेनं म्हटलं आहे की, सांस्कृतिक केंद्रामध्ये सुरुवातीला डिजिटल सिनेमा हॉल, संशोधन देणारी ग्रंथालय तसंच पुस्तकांचे दुकान असण्याची अपेक्षा होती. अलीकडील घडामोडींवर एनएफडीसीनं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.हेही वाचा

कल्याणचा पत्री पूल जानेवारी २०२१ पर्यंत खुला

26/11 Attack : कसाबविरोधात साक्ष देणाऱ्या 'तिला' न्याय कधी मिळणार?

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा