Advertisement

कल्याणचा पत्री पूल जानेवारी २०२१ पर्यंत खुला

पत्रीपुलाची अन्य कामे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करून जानेवारीत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचं राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

कल्याणचा पत्री पूल जानेवारी २०२१ पर्यंत खुला
SHARES

कल्याणच्या पत्रीपुलाचं गर्डर लाँचिंगचं काम रविवारी मध्यरात्री रेल्वेने विशेष मेगाब्लॉक घेऊन साेमवारी पहाटे ६ वाजता पूर्ण केलं . पत्रीपुलाची अन्य कामे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करून जानेवारीत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचं राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

पत्रीपुलाच्या गर्डर लॉंंचिंगसाठी २१ आणि २२ नोव्हेंबर या दोन दिवसांत प्रत्येकी चार तासांचा रेल्वेने मेगाब्लॉक घेतला होता. पहिल्या दिवशी चार तासांत गर्डर ४० मीटर पुढे सरकवण्यात आला होता. उर्वरित गर्डर सरकवण्याचे काम रविवारी करण्यात आले.

दादर येथे उद्यान एक्स्प्रेस बंद पडल्याने रेल्वे मेगाब्लॉकला विलंब झाला. त्यामुळे वेळ अपुरी पडून १८ मीटर गर्डर सरकवण्याचे काम शिल्लक होते. त्यामुळे रेल्वेकडून रविवारी रात्री १.३० ते पहाटे ३ वाजेपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात आला. सोमवारी पहाटे ६ वाजता हे काम पूर्ण झाले. ७०० टन वजनाचे गर्डर लाँचिंग यशस्वी झाले.

कल्याणचा ब्रिटिश कालीन पत्रिपुल १०२ वर्षे जुना झाल्यामुळे या पुलावरील वाहतूक बंद करण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले होते. त्यानंतर १८ नोव्हेंबर २०१८ रोजी हा पूल तोडण्यात आला. त्यानंतर या पूलाच्या पुनर्निर्माणाचे काम एक-दीड वर्ष रखडले. पुननिर्माण सुरू झाल्यानंतर मार्च ते जून २०२० मध्ये कोरोना काळात पूर्ण काम बंद ठेवावे लागले होते. हेही वाचा -

26/11 Mumbai Attack : ७ कोटीचे मोबाईल स्कॅनर व्हेईकल धूळखात पडून

मुंबई विमानतळावर १८ कोटींचे कोकेन जप्त
Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा