मुंबई विमानतळावर १८ कोटींचे कोकेन जप्त

डीआरआय विभागानं मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर १८ कोटींचे कोकेन जप्त केलं आहे.

मुंबई विमानतळावर १८ कोटींचे कोकेन जप्त
SHARES

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर १८ कोटींचे कोकेन डीआरआय विभागानं जप्त केलं आहे. पश्चिम अफ्रिकेच्या ड्रग्ज तस्कराकडून हे कोकेन जप्त केलं आहे. डीआरआय विभागाची मागील १० दिवसातली ही दुसरी मोठी कारवाई आहे. जप्त करण्यात आलेल्या कोकेनचे वजन २ किलो ९३५ ग्रॅम आहे. या ड्रग्ज तस्कराला ८ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत १८ कोटी रुपये आहे. पश्चिम अफ्रिकेतील गिनी येथील रहिवासी असलेल्या ड्रग्ज तस्कराला डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. एक ड्रग्ज तस्कर आपल्यासोबत कोकेन घेऊन मुंबईत येत असल्याची गुप्त माहिती मुंबईच्या डीआरआयच्या विभागाला मिळाली. हे कळताच डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. त्यानंतर ड्रग्ज तस्कर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होताच डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली.

ताब्यात घेतलेला ड्रग्ज तस्कर मूळचा पश्चिम आफ्रिकेतील गिनी येथील रहिवाशी असल्याचं समजतं. त्याचं नाव मुसा आहे. डीआरआयच्या आधिकाऱ्यांनी तस्कराला ताब्यात घेतल्यानंतर त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडचे २ किलो ९३५ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलं. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल १८ कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टानं या तस्कराला ८ डिसेंबरपर्यंत न्यायायलीन कोठडी सुनावली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा