नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ११२ रुग्ण

नवी मुंबईत गुरूवारी (५ नोव्हेंबर) कोरोनाचे नवीन ११२ रुग्ण सापडले आहेत. तर २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४५,१४३ झाली आहे. 

गुरूवारी बेलापूर २७, नेरुळ १८, वाशी १९, तुर्भे १०, कोपरखैरणे १६, घणसोली ७, ऐरोली ११, दिघामध्ये ४ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात १६६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. बेलापूर ४१, नेरुळ २१, वाशी १९, तुर्भे २२, कोपरखैरणे २४, घणसोली १३, ऐरोली ११, दिघामध्ये ५१ रुग्ण बरे झाले आहेत.  

बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२,६९७ झाली आहे. तर मृतांचा आकडा ९१५ झाला आहे. नवी मुंबईत सध्या १५३१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९४ टक्के झाला आहे. 

शहरात खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या देयकांच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. यासाठी पालिकेने पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी ०२२२/ ७५६७३८९  किंवा ७२०८४९००१० या व्हॉटसअॅप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचा -

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ दिवासापासून सुरू होणार सिनेमागृह, नाट्यगृह  Diwali 2020

दिवाळीत जादा भाडे आकारल्यास खासगी वाहतूकदारांवर होणार कारवाई 


पुढील बातमी
इतर बातम्या