पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी ११७ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी (१४ ऑक्टोबर) ११७ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २४० रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर २ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये खारघर आणि तळोजा येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील १२, नवीन पनवेल ८, खांदा काॅलनी ३, कळंबोली १०, कामोठे ३३, खारघर ४८, तळोजा येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ४२ नवीन पनवेल २२, कळंबोली ५९, कामोठे ५२, खारघर ६१  तळोजा येथील ४ रुग्णांचा समावेश आहे.   

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २१८५३ कोरोनाबाधित रूग्णांपैकी १९८७३ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५०३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १४७७ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 


हेही वाचा -

NDRF आणि NSSचं कोरोनाव्हारस विरोधात जनजागृती अभियान

MPSC ची नोव्हेंबरमधील परीक्षाही पुढे ढकलली


पुढील बातमी
इतर बातम्या