धारावीत सोमवारी १२ नवीन रुग्ण

धारावीत सोमवारी केवळ १२ नवीन रुग्ण सापडले आहेत. येथील रुग्णांची संख्या आता २५८५  वर पोहोचली आहे. यामधील २२५१ कोरोनामुक्त झाले आहेत.तर केवळ ७८ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  

 धारावी नियंत्रणात आली असली आता दादर-माहीम मधील रुग्णसंख्या काहीशी वाढताना दिसत आहे. दादरमध्ये सोमवारी ४१ नवीन रुग्ण सापडले आहेत. येथील रुग्णांची एकूण संख्या १८७० इतकी झाली आहे. तर ४९९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीममध्ये २९ नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या १७६२ इतकी झाली आहे. येथे सध्या तर २४० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. जी उत्तर मध्ये सध्या एकूण ८१७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

जी उत्तर विभागातील कोरोना रुग्णांच्या संख्येत ८२ रुग्णांची भर पडली असून जी उत्तर विभागातील रुग्णसंख्या ६२१६ वर पोहोचली आहे.  त्यात धारावी २५८५, दादर १८७० तर माहीम १७६२ रुग्णांचा सामवेश आहे. तर धारावीमध्ये २२५१,दादरमध्ये १२९० तर माहीम मध्ये १४४७ असे एकूण ४९८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 


हेही वाचा - 
गुड न्यूज! मुंबईतील सर्व दुकाने आता एकाचवेळी सुरू राहणार
जिम, माॅल सुरू करणार पण.., राजेश टोपेंनी केला खुलासा


पुढील बातमी
इतर बातम्या