राज्यात मंगळवारी १३२ रुग्णांचा मृत्यू, २८,६९९ नवे रुग्ण

राज्यात मंगळवारी कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. मंगळवारी तब्बल १३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना पुन्हा उग्र रुप धारण करण्याची भिती आता आरोग्य यंत्रणांना वाटू लागली आहे. राज्यात मंगळवारी कोरोनाचे नवीन २८ हजार ६९९ रुग्ण आढळले. तर १३ हजार १६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यातल्या एकूण कोरोना रुग्णांचा आकडा २५ लाख ३३ हजार २६ झाला आहे. तर आतापर्यंत ५३ हजार ५८९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर गेला आहे. तर रिकव्हरी रेट  ८८.७३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

राज्यात सध्या २ लाख ३० हजार ६४१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ४३ हजार ५९० इतरे रुग्ण आहेत तर नागपूर जिल्ह्यातील आकडा वाढून तो ३३ हजार १६० इतका झाला आहे. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा २६ हजार ५९९ इतका आहे. तर ठाणे जिल्ह्यात २२ हजार ५१३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ८५ लाख ८४ हजार ४६३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २५ लाख ३३ हजार ०२६ (१३.६३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११ लाख ७७ हजार २६५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ११ हजार ८८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

मंगळवारी  मुंबईत ३५१२ नवे रुग्ण सापडले असून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२०३ रुग्ण बरे झाले आहेत.  कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने मुंबई महानगर पालिकेने यंदा होळी आणि धुलिवंदन हे उत्सव खासगी किंवा सार्वजनिक ठिकाणी साजरे करण्यावर बंदी घातली आहे.

हेही वाचा -

केंद्राचा मोठा निर्णय, ४५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्या सगळ्यांना कोरोना लस

दादर भाजी मार्केटमधील ७ फेरीवाले कोरोना पॉझिटिव्ह

पुढील बातमी
इतर बातम्या