Advertisement

केंद्राचा मोठा निर्णय, ४५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्या सगळ्यांना कोरोना लस

येत्या १ एप्रिलपासून कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यांतर्गत ४५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्या सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने परवानगी दिली आहे.

केंद्राचा मोठा निर्णय, ४५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्या सगळ्यांना कोरोना लस
SHARES

येत्या १ एप्रिलपासून कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यांतर्गत ४५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्या सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने परवानगी दिली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. 

कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये ६० वर्षांहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसोबत केवळ सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना कोरोना लस देण्यात येत होती. परंतु आता या वयोमर्यादेपुढील सरसकट सर्वांनाच कोरोनावरील लस मिळणार आहे. त्यामुळे ४५ आणि त्याहून अधिक वय असणाऱ्या सर्वांनी लसीकरणासाठी नोंदणी करण्याचं आवाहन प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे.

कोरोना विषाणू (coronavirus) प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि कोरोना योद्ध्यांचं लसीकरण करण्यात आलं. त्यानंतर १६ फेब्रुवारीपासून ६० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांचं लसीकरण सुरु करण्यात आलं. तर १ मार्चपासून ४५ हून अधिक वय असणाऱ्या आणि सहव्याधी असणाऱ्यांचं लसीकरण करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. 

हेही वाचा- ३ महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य - राजेश टोपे

मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोरोना टास्क फोर्स आणि वैज्ञानिक आधारांच्या सहाय्याने २ महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत. त्यानुसार ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व नागरिकांना कोरोनाची लस उपलब्ध करूण देणे आणि दोन डोसदरम्यान ४ किंवा ६ आठवड्यांचा वेळ निश्चित करणे, असे हे निर्णय आहेत, असं जावडेकर यांनी सांगितलं.

भारतामध्ये अत्यंत वेगाने आणि योग्य प्रकारे कोरोना प्रतिबंधक लसीकरण जात आहे. आतापर्यंत ४ कोटी ८५ लाख कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस देण्यात आले आहेत. यापैकी ४ कोटींपेक्षा जास्त व्यक्तींना कोरोनावरील (covid19) लसीचा पहिला डोस तर ८५ लाख व्यक्तींना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. 

फेब्रुवारीमध्ये दिवसाला ३ लाख ७७ हजार कोरोनावरील लसीचे डोस देण्यात येत होते. मार्च महिन्यात ही आकडेवारी दिवसाला १५ लाख ५४ हजारांपर्यंत गेली आहे. मागील आठवड्यामध्ये (१४ ते २० मार्च दरम्यान) दिवसाला २० लाख डोस देण्यात आले. तर गेल्या २४ तासांमध्ये विक्रमी ३२ लाख ५४ हजार जणांना कोरोनावरील लसीचे डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती देखील प्रकाश जावडेकर यांनी दिली.

(union cabinet decided COVID 19 vaccination will be opened from 1st April for all citizens above the age of 45)

हेही वाचा- कोविशील्ड व्हॅक्सीनचा दुसरा डोस ८ आठवड्यानंतर मिळणार


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा