Advertisement

३ महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य - राजेश टोपे

राज्यात आढळणार्‍या नव्या कोरोना बाधितांबरोबरच रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे.

३ महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य - राजेश टोपे
SHARES

राज्यात आढळणार्‍या नव्या कोरोना बाधितांबरोबरच रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर दररोज ३ लाख लोकांचे लसीकरण केले जात असून ३ महिन्यात लसीकरण कार्यक्रम पूर्ण करण्याचा आमचा संकल्प राहील, असे आरोग्य मंत्री टोपे यांनी जाहीर केले आहे.

दररोज राज्यात ३ लाख लोकांचं लसीकरण होत आहे. लसीकरणासाठी खासगी ठिकाणं वाढविली जात आहेत. ग्रामीण भागात उपकेंद्रापर्यंत लसीकरणाच्या दृष्टीनं लोकांची व्यवस्था केली जात आहे. आता २० बेडेड हॉस्पिटलपर्यंत देखील लसीकरणाची व्यवस्था केली जात असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केलं. आम्हाला मोठ्या प्रमाणावर लसीकरण करायचं आहे. आमचा पूर्ण प्रयत्न आहे ३ महिन्यात लसीकरण कार्यक्रम पूर्ण संपवायचा. त्यामुळे लसीकरणावर आम्ही विशेष लक्ष केंद्रित केले आहे, असे त्यांनी सांगितले.

गृहविलगीकरणात ज्यांना ठेवण्यात आले आहे, त्यांच्यावर त्यांनी स्वतःही लक्ष द्यावे. अनेकजण सोसायटीमध्ये राहतात, तेथील पदाधिकार्‍यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आरोग्य कर्मचारी देखील त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत, त्यामुळे संसर्ग कसा टाळता येईल, या दृष्टीने आपण सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत, असे टोपेंनी सांगितले.

निवडणुका सुरू आहेत त्या गुजरातमध्ये आयपीएल मॅचेस सुरू आहेत. तिथे गाईडलाईन्सची अंमलबाजवणी होत नाही. हाफकीनमध्ये लसीच्या निर्मितीला परवानगी मिळाली तर तिथे १७ लाख डोस तयार करता येतील.

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची रुग्ण वाढीची टक्केवारी कमी आहे.आपली ८० टक्के असेल तर इतर ठिकाणी २०० टक्के आहे. कोविशील्डच्या २ डोसमध्ये ४५ ते ६० दिवसांचे अंतर ठेवण्याच्या सूचना केंद्राने दिल्याची माहिती टोपे यांनी दिली. संसर्गजन्य परिस्थितीत काही शहरात लॉकडाउन लावावे लागेल असा इशारा त्यांनी दिला. आता कठोर निर्णय घ्यावे लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. लॉकडाऊन टाळायचे असेल तर जनतेने नियम पाळायला हवेत, असे आवाहन टोपे यांनी केले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा