Advertisement

कोवीशील्ड व्हॅक्सीनचा दुसरा डोस ८ आठवड्यानंतर मिळणार

केंद्राच्या निर्देशानुसार, कोवीशील्डच्या दोन डोसमध्ये आता कमीत-कमी ६ ते ८ आठवड्यांचे अंतर ठेवलं जाईल.

कोवीशील्ड व्हॅक्सीनचा दुसरा डोस ८ आठवड्यानंतर मिळणार
SHARES

सरकारनं अॅस्ट्राजेनेकाची कोरोना व्हॅक्सीन कोवीशील्डच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील वेळेला वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या निर्देशानुसार, कोवीशील्डच्या दोन डोसमध्ये आता कमीत-कमी ६ ते ८ आठवड्यांचे अंतर ठेवलं जाईल.

सध्या दोन डोसमध्ये २८ दिवसांचे अंतर आहे. दरम्यान, हा निर्णय कोव्हॅक्सिनवर लागू होणार नसल्याचंही केंद्रानं स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारनं सांगितल्यानुसार, नॅशनल टेक्निकल अॅडवायजरी ग्रुप ऑन इम्यूनाइजेशन (NTAGI) आणि व्हॅक्सीनेशन एक्सपर्ट ग्रुपच्या ताजा रिसर्चनंतर हा निर्णय घेतला जात आहे.

या निर्णयाची अंमलबजावनी राज्य सरकारनं करण्याचंही केंद्रानं सांगितलं आहे. दावा केला जात आहे की, व्हॅक्सीनचा दुसरा डोस ६-८ आठवड्यानंतर दिल्यानंतर व्हॅक्सीनचा परिणाम जास्त मिळत आहे.

देशात कोरोना संक्रमनामुळे नवीन रुग्णात मोठ्या प्रमाणावर भर पडत असून दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढत आहे. चितेंची गोष्ट ही की, नवीन रुग्णांसोबत उपचार घेणाऱ्या रुग्णांचा आकडादेखील कमी होत नाही आहे. गेल्या ३८ दिवसांमध्ये नवीन रुग्णांच्या संख्येत तब्बल २ लाखांनी वाढ झाली आहे.

देशात ११ फेब्रुवारी रोजी १.३३ लाख पॉझिटिव्ह रुग्ण होते. गेल्या रविवारी त्यात भर पडत त्यांची संख्या ३.३१ लाख एवढी झाली आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये हे एका दिवसातील सर्वात मोठा आकडा असून त्यात २५ हजार ५७८ वाढ झाली आहे. यापूर्वी १० सप्टेंबर रोजी २४ हजार ६१० नवीन रुग्ण आढळून आले होते.

देशात आता एकूण १ कोटी १६ लाख लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. १ कोटी ११ लाख रुग्ण बरे झाले आहे. तर १ लाख ६० हजार लोकांचा मृत्यूही झाला आहे. देशात आजघडीला ३ लाख ३१ हजार ६७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.



हेही वाचा

मुंबईत मास्क न घालणाऱ्यांकडून ४० कोटींची वसूली

आंतरराष्ट्रीय प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणातून सूट

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा