Advertisement

मुंबईत मास्क न घालणाऱ्यांकडून ४० कोटींची वसूली

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महापालिकेकडून कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र, अनेक लोक नियमांचं उल्लंघन करत आहे. अशा नागरिकांवर पालिकेने कारवाईचा बडगा तीव्र केला आहे.

मुंबईत मास्क न घालणाऱ्यांकडून ४० कोटींची वसूली
(File Image)
SHARES

मुंबईत कोरोनाचा उद्रेक झाल्याचं दिसून येत आहे. रोज अडीच ते तीन हजार नवीन कोरोना रुग्ण आढळत आहेत. मुंबईतील कोरोनाचा हा फैलाव चिंताजनक आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महापालिकेकडून कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र, अनेक लोक नियमांचं उल्लंघन करत आहे. अशा नागरिकांवर पालिकेने कारवाईचा बडगा तीव्र केला आहे.

मुंबई महापालिकेनं एप्रिल २०२० ते २१ मार्च २०२१ पर्यंत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली आहे. या कालावधीत पालिकेने विनामास्क फिरणाऱ्या २० लाख लोकांवर कारवाई केली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या या लोकांकडून ४० कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

मुंबईत रविवारी कोरोनाचे नवीन ३७७५ रुग्ण आढळले आहेत. तर १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी आठवडाभरात १८६ दिवसांवरून १०६ दिवसांवर आला आहे. मुंबईत सध्या २३ हजार ४४८ रुग्ण उपचार घेत आहे. ३१६ सोसायट्या रुग्ण आढळल्याने सील करण्यात आल्या आहेत. तर प्रतिबंधित चाळी आणि झोपडपट्ट्यांची संख्या ४० वर गेली आहे.



हेही वाचा -

  1. २४ तास लसीकरणाचा पर्याय महापालिकेच्या विचाराधीन

  2. धारावीत मार्च महिन्यात ६२ टक्के रुग्ण वाढले

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा