Advertisement

दादर भाजी मार्केटमधील ७ फेरीवाले कोरोना पॉझिटिव्ह

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने मुंबई महानगर पालिकेका पुन्हा कामाला लागली आहे.

दादर भाजी मार्केटमधील ७ फेरीवाले कोरोना पॉझिटिव्ह
SHARES

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने मुंबई महानगर पालिकेका पुन्हा कामाला लागली आहे. शहरातील महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी पालिकेने कोरोनाची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यास सुरुवात केली आहे. याच टेस्टदरम्यान मुंबईच्या दादरमधील सर्वात मोठ्या भाजी मार्केटमधील तब्बल सात फेरीवाले कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. यामुळे मार्केट परिसरातील फेरीवाल्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दादर स्टेशन परिसरात ६७ फेरीवाल्यांची कोरोना रॅपिड अँटिजन टेस्ट सोमवारी करण्यात आली होती. यातील सात फेरीवाल्यांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत. या सातही जणांना उपचारांसाठी क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. दादर रेल्वे स्थानकाबाहेरील फूल तसेच भाजी मार्केट खूप वर्षे जुने प्रसिद्ध मार्केट आहे.

रेल्वे स्थानकाला लागून हे मार्केट असल्याने दररोज हजारो प्रवासी येथे खरेदी करण्यासाठी गर्दीच करतात. या मार्केटमध्ये फूल, भाजीसह अनके कपडे आणि चपल्लांची देखील दुकाने आहेत. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास कोरोना नियमांना पायदळी तुडवत खरेदीची एकच झुंबड असते. दादर परिसरातील बाजारांत कोरोना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे दिसते.

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेंडणेकर यांनी दादर प्लाझा जवळील भाजी मार्केटला भेट देत फेरीवाल्यांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. मात्र हे फेरीवाले सर्रास विनामास्क असल्याचे काही वेळा दिसते. यामुळे मुंबईत कोरोना रुग्ण झपाड्याने वाढत आहे.

यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहरातील गर्दीचे रेल्वे स्थानक, मॉल, बस स्थानक, बाजार अशा गर्दीच्या ठिकाणी कोरोना रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. त्यामुळे शहरातील मॉल्स, रेल्वे स्थानकात प्रवेश करण्याआधी कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असणे बंधनकारक असणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा