पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी १३६ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी (२२ ऑक्टोबर) १३६ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून १६७ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर कळंबोली येथील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील २१, नवीन पनवेल ४१, खांदा काॅलनी २, कळंबोली ५, कामोठे २३, खारघर ३७, तळोजा येथील ६ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल १५, नवीन पनवेल ३६, कळंबोली १५, कामोठे ४०, खारघर ५३ तळोजा येथील ८ रुग्णांचा समावेश आहे.  

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २२७७९ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २१२२५ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५२८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १०२६ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.


हेही वाचा -

सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल: एक ते दोन दिवसांत निर्णय? 

जी उत्तर विभागातील वरळी परिसर रुग्णसंख्येत शेवटच्या क्रमांकावर


पुढील बातमी
इतर बातम्या