Advertisement

कोरोना रुग्णांच्या संख्येत वरळी शेवटच्या क्रमांकावर

महापालिकेच्या अनेक विभागातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून, रुग्णवाढही कमी झाली आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येत वरळी शेवटच्या क्रमांकावर
SHARES

मुंबईत कोरोनाच्या (corona) वाढत्या प्रादुर्भावाला नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेचे (bmc) कर्मचारी, डॉक्टर, सफाई कामगार आपला जीव धोक्यात घालून कार्य करत आहेत. त्याशिवाय, महापालिकेच्या अनेक विभागातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून, रुग्णवाढही कमी झाली आहे. यामध्ये वरळी, प्रभादेवीचा भाग असलेला जी-दक्षिण विभाग कार्यालयाचा परिसर सुरुवातीच्या काळात कोरोना संक्रमण आणि रुग्णांच्या संख्येत पहिल्या क्रमांकावर होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून या भागातील रुग्णसंख्या नियंत्रणात आली असून हा परिसर रुग्णवाढीत सर्वात शेवटच्या क्रमांकावर पोहोचला आहे.

जी दक्षिण (g south) परिसरातील रुग्णवाढही कमी झाली असून या विभागातील रुग्ण दुपटीचा कालावधीही १५४ दिवसांवर पोहोचला आहे. रुग्णसंख्येत वरळी, (worli) प्रभादेवीचा भाग असलेला जी दक्षिण विभाग सतत पहिल्या क्रमांकावर होता. मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे या विभागातील रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात आली. ऑक्टोबरपासून या भागातील रुग्णवाढीचा दर अर्ध्या टक्क्यापेक्षाही खाली आला आहे. तर रुग्णदुपटीचा कालावधी मुंबईत सरासरी १०० दिवसांवर असून, वरळी, प्रभादेवीत १५४ दिवसांवर गेला आहे.

मुंबईतील दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये कोरोनाला अटकाव कसा करायचा याची कोणतीही सुनिश्चित पद्धती नसताना सगळ्याच सरकारी यंत्रणा चाचपडत होत्या. त्यावेळी वरळीत या उपाययोजनांना प्रथम सुरुवात झाली. गावठाण प्रतिबंधित करणे, रुग्णांना शोधणे, त्यांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे, त्यांचे विलगीकरण करणे, संसर्ग वाढू न देणे आणि दुसऱ्या बाजूला त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे ही कसरत पालिकेच्या विभाग कार्यालयाने केली.

सध्यस्थितीत जास्तीत जास्त चाचण्या, रुग्णांच्या निकट संपर्काचा शोध घेणे, सार्वजनिक शौचालयांचे निर्जंतुकीकरण आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरूच आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा