पनवेल महानगरपालिका हद्दीत शुक्रवारी आढळले १४५ नवीन रुग्ण

पनवेल महानगरपालिका हद्दीत शुक्रवारी कोरोनाचे १४५ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४६१४ वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा १०८ वर गेला आहे. 

शुक्रवारी सापडलेल्या नव्या रुग्णांमध्ये पनवेलमधील २५, नवीन पनवेलमधील ३१, खांदा कॉलनी ५, कळंबोलीतील २३, कामोठे १७, खारघरमधील ३७ आणि तळोजामधील ७ रूग्णांचा समावेश आहे.

शुक्रवारी १८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बरे झालेल्या रुग्णांमध्ये पनवेल ४४, नवीन पनवेल २५, कळंबोली ४६, कामोठे ३१, खारघर ३०, तळोजातील ८ रुग्ण आहेत. पनवेल मनपा क्षेत्रात आतापर्यंत ३०७४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या १४३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


हेही वाचा -

अखेर डहाणू ते चर्चगेट लोकल रुळावर, अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना दिलासा

महापालिकेनं अखेर नाल्यावरील 'तो' फलक हटवला


पुढील बातमी
इतर बातम्या