Advertisement

महापालिकेनं अखेर नाल्यावरील 'तो' फलक हटवला


महापालिकेनं अखेर नाल्यावरील 'तो' फलक हटवला
SHARES
मुंबई महापालिकेनं ‘नाल्यात पडून दुर्घटना झाल्यास पालिका जबाबदार नाही!’ अशा आशयाचा फलक लावला होता. गोरेगाव पूर्वेकडील आंबेडकर नगरातील नाल्याजवळ पालिकेनं हा फलक लावला होता. या फलकामुळं महापालिका आपली जबाबदारी झटकत असून, नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु, महापालिकेने हा फल हटवला आहे. आता या ठिकाणी तात्पुरते अटकाव करणारे रेलिंग लावले आहे.

गोरेगाव पूर्वेकडील आंबेडकर नगरात गतवर्षी एक दीड वर्षांचा दिव्यांश हा मुलगा नाल्यात पडून वाहून गेला. त्याच ठिकाणी पालिकेने फलक लावला होता. पावसामुळे नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिंकानी अंध, अपंग व लहान मुलांची काळजी घ्यावी, असा इशारा यामध्ये पालिकेने दिला होता. 

ज्या ठिकाणी दिव्यांश पडला त्याच जागी हा फलक लावल्यामुळे नागरिंकांमध्ये त्या दुर्घटनेची आठवण करून देत पालिकेने जबाबदारी झटकली होती. दरम्यान या प्रकरणी स्थानिक नगरसेवकांनी पी दक्षिण पालिका विभाग कार्यालयाला पत्र देत हा फलक तत्काळ काढून टाकण्याची मागणी केली. या नाल्यावर संरक्षक भिंत किंवा संरक्षक जाळ्या बसवाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. 

गोरेगावमध्ये जिथे दुर्घटना होण्याची शक्यता आहे, तिथे उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर पालिकेच्या विभाग कार्यालयातील देखभाल विभागातील अभियंत्यांनी व पालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन हा फलक काढला.



हेही वाचा -

अखेर डहाणू ते चर्चगेट लोकल रुळावर, अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना दिलासा

महापालिकेनं अखेर नाल्यावरील 'तो' फलक हटवला



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा