Advertisement

अखेर डहाणू ते चर्चगेट लोकल रुळावर, अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना दिलासा


अखेर डहाणू ते चर्चगेट लोकल रुळावर, अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना दिलासा
SHARES
अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या विरार, डहाणू परिसरातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनानं या भागातून मुंबईत रुग्णांच्या सेवेसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांकरीता डहाणू ते चर्चगेट लोकल सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, शुक्रवार पासून या सेवेला सुरुवात ही झाली. शुक्रवारी पहाटे ४.४० वाजता पहिली लोकल सोडण्यात आली. दरम्यान या लोकल फेरीसाठी काही लोकल फेऱ्यांच्या वेळेत व अंतिम स्थानकात बदल केले आहेत.

पश्चिम रेल्वेच्या पालघर, डहाणू, वैतरणा, बोईसर या भागांतून मुंबईच्या दिशेने पहाटेच्या सुमारास मेमू व लोकल चालवण्यात येतात. परंतु पहाटे ५ वाजताची डहाणू ते बोरीवली मेमू गाडी ही ५.४० वाजता डहाणू ते विरार लोकल म्हणून चालवण्यात येत आहे. त्यामुळे विरारला उतरुन पुन्हा मुंबईच्या दिशेने लोकल पकडावी लागते. परिणामी कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर होतो. 

अनेक परिचारिका, वॉर्डबॉय यांनी ही वेळ आणि लोकलचे अंतिम स्थानक बदलण्याची मागणी केली होती. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही हीच मागणी उचलून धरली. त्यानुसार हा बदल करण्यात येत आहे.

१७ जुलैपासून पहाटे ४.४० वाजता डहाणू ते विरार अशी गाडी चालवली जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनानं दिली. त्यानुसार, पहाटे ५.४० वाजता डहाणू रोड ते विरार गाडी असेल. त्याआधीही पहाटे ४.१५ वाजता विरार ते डहाणू रोड आणि सकाळी ७.४० वाजता चर्चगेट ते डहाणू रोड गाडी चालवण्यात येणार आहे.



हेही वाचा -

अखेर डहाणू ते चर्चगेट लोकल रुळावर, अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना दिलासा

महापालिकेनं अखेर नाल्यावरील 'तो' फलक हटवला



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा