नवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन १५० रुग्ण

नवी मुंबईत शुक्रवारी (३० ऑक्टोबर) कोरोनाचे नवीन १५० रुग्ण सापडले आहेत. तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४४,३७२ झाली आहे.

शुक्रवारी बेलापूर ४३, नेरुळ २१, वाशी १५, तुर्भे २२, कोपरखैरणे २५, घणसोली ११, ऐरोली १२, दिघामध्ये १ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात १८० जणांनी कोरोनावर मात केली आहे. बेलापूर ५३ नेरुळ ३९, वाशी २९, तुर्भे १६, कोपरखैरणे १७,  घणसोली १६, ऐरोली ९, दिघामधील १ रुग्ण बरे झाले आहेत.  

बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१,६०१ झाली आहे. तर मृतांचा आकडा ८९८ झाला आहे. नवी मुंबईत सध्या १८७३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९३ टक्के झाला आहे. 

शहरात खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या देयकांच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. यासाठी पालिकेने पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी ०२२२/ ७५६७३८९  किंवा ७२०८४९००१० या व्हॉटसअॅप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचा -

फ्रान्सच्या राष्ट्रध्यक्षांविरोधात भेंडी बाजारात अनोखे आंदोलन

पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीनं फेटाळला


पुढील बातमी
इतर बातम्या