Advertisement

पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीनं फेटाळला

मुंबई महापालिकेचा पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीनं फेटाळला आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीनं फेटाळला
SHARES

मुंबई महापालिकेचा पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीनं फेटाळला आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. चाळी आणि झोपडपट्ट्या वगळून प्रतिदिन दरडोई १५० ते २०० लिटरहून अधिक पाण्याचा वापर करणाऱ्यांकडून २० ते ३० रुपये अशी दुप्पट दरवाढ महापालिका प्रशासनाने प्रस्तावित केली आहे. गुरुवारी स्थायी समितीत या दरवाढीला विरोध केला.

पाणी पुरवठ्याच्या राष्ट्रीय प्रमाणकानुसार, प्रति व्यक्ती दररोज १५० लिटर इतका पाण्याचा वापर हवा होता. परंतु, मुंबईत अनेक इमारतींमध्ये दररोज दरोडोई पाणी वापर हा १५० लिटरपेक्षा जास्त होत आहे. त्यामुळे या जास्तीच्या पाण्याला जास्त दर लावण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर आणला होता. ओसी नसलेल्या इमारतींमध्येही पुरवठा होणाऱ्या पाणीदरातही याचप्रमाणे वाढ केली जाणार होती.

या प्रस्तावाला शिवसेना भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने तीव्र विरोध दर्शवला. भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दरवर्षी आठ टक्के पाणी दरवाढ करण्याचे ठरले असताना, ही शंभर टक्के दरवाढ अन्यायकारक असल्याचे सांगत विरोध दर्शविला. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका मुंबईकरांना पुरेसे पाणी देऊ शकत नसताना दरवाढ कशी काय करते, असा सवाल करत प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची सूचना केली. 

सध्या दरडोई १५० लिटर पाणी वापरणाऱ्यांना १ हजार लिटरसाठी ५.२२ रूपये दर आहे. तर १५० ते २०० लिटर पाणी वापरणाऱ्यांसाठी १०.४४ रूपये इतका दर आहे.  तर 200 ते 250 लिटरकरता १५.६६ वरून २६.१० रूपये इतका आणि २५० हून अधिक लिटरकरता २०.८८ वरून ३१.३२ रूपये इतका दर प्रस्तावित होता. परंतु स्थायी समितीत हा प्रस्ताव फेटाळून लावल्यानं ही दरवाढ होणार नाही.



हेही वाचा -

 मुंबईच्या या भागातील रुग्णसंख्येत घट; स्थानिकांना दिलासा

कोरोनामुळं आर्थिक स्थिती बिकट; १४ वर्षांच्या मुलावर चहा विकण्याची वेळ



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा