Advertisement

मुंबईच्या या भागातील रुग्णसंख्येत घट; स्थानिकांना दिलासा


मुंबईच्या या भागातील रुग्णसंख्येत घट; स्थानिकांना दिलासा
SHARES

काही दिवसांपासून मुंबईतील परळ आणि शिवडी या भागात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत होती. मात्र आता या परिसरातील दर दिवशीची रुग्णसंख्या वेगाने कमी होत असून गेल्या काही दिवसांपासून दर दिवशी १०च्या आतच नवीन रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळं मुंबईत कोरोना नियंत्रणात येत असल्याचं चित्र आहे.

या भागांतील रुग्णदुपटीचा कालावधी ३२० दिवसांवर आला आहे. तसंच, परळ आणि शिवडीचा भाग असलेल्या एफ दक्षिण विभागामध्ये रुग्णांची संख्या वेगाने कमी होत आहे. मुंबईतील मशीद बंदर, डोंगरीचा तसेच गिरगाव-मुंबादेवीचा भाग असलेल्या सी व बी विभागातही रुग्णसंख्या कमी होत असली तरी या भागातील लोकसंख्या कमीच असल्यामुळे इथे रुग्णवाढ आधीपासूनच कमी होती.

गणेशोत्सवानंतर सप्टेंबर महिन्यात संपूर्ण मुंबईतील रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. परळ, लालबाग, शिवडी हा निवासी भाग असून या भागात चाळी, लहान घरे, झोपडपट्ट्या, सणउत्सावाच्या निमित्ताने होणारी गर्दी यांचे प्रमाण प्रचंड आहे. मात्र या भागात पालिकेने गेल्या काही महिन्यापासून सातत्याने जे काम केले, त्यामुळे येथील रुग्णवाढ आटोक्यात येऊ लागली आहे.

संपूर्ण मुंबईत महापालिकेनं ज्या पद्धतीनं कोरोनाची रुग्णवाढ थोपवण्यासाठी काम केलं. कोरोनाबाधित रुग्ण आढळला की त्यांचे जास्तीत जास्त निकट संपर्क शोधून त्यांचे विलगीकरण करण्यात आलं होतं. चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली. त्यामुळं रुग्णसंख्या आटोक्यात येऊ लागली आहे.

या भागात रुग्णदुपटीचा कालावधी ३२० दिवसांवर गेला आहे. हा कालावधी जितका मोठा तितकी करोनाची रुग्णवाढ आटोक्यात असा निकष आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा