Advertisement

कोरोनामुळं आर्थिक स्थिती बिकट; १४ वर्षांच्या मुलावर चहा विकण्याची वेळ

आर्थिक स्थिती बिकट झाल्यानं घर कसं चालवायचं? असा प्रश्न त्यांच्या पुढ्यात उपस्थिती झाला.

कोरोनामुळं आर्थिक स्थिती बिकट; १४ वर्षांच्या मुलावर चहा विकण्याची वेळ
SHARES

कोरोनामुळं (coronavirus) मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. या लॉकडाऊनमुळं अनेक नोकरवर्गातील कर्मचाऱ्यांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावं लागलं. परिणामी आर्थिक स्थिती बिकट (financial issue) झाल्यानं घर कसं चालवायचं? असा प्रश्न त्यांच्या पुढ्यात उपस्थिती झाला. त्यामुळं अनेकांनी आर्थिक भार सांभाळण्यासाठी घरगुती सामान, वाण सामान, चहा, नाश्टा यांसारख्या अनेक छोट्या-छोट्या धंदा लावण्यास सुरुवात केली. मात्र अशीच वेळ आता एका १४ वर्षीय मुलावर आली आहे. अभ्यास करण्याच्या काळात हा मुलगा आर्थिक भार संभाळण्यासाठी चहा विकतो आहे.

कोरोना संकट आणि लॉकडाऊमुळं या मुलावर चहा विकण्याची वेळ आली आहे. एक वृत्तपत्रानं याबाबत माहिती दिली असून, संबंधित मुलगा चहा तयार करुन मुंबईतील भेंडी बाजार नागपाडा या ठिकाणी चहा विकतो. 'माझं चहाचं दुकान नाही मी चहा तयार करुन भेंडी बाजार, नागपाडा (nagpada) आणि इतर भागांमध्ये विकतो. दिवसाकाठी ३०० ते ४०० रुपये मिळतात. ते पैसे मी आईला देतो. काही पैशांची बचत करतो', अशी माहिती या मुलान दिली.

माझे वडील १२ वर्षांपूर्वी वारले. माझ्या बहिणी या ऑनलाइन क्लासेसद्वारे शिक्षण घेत आहेत. शाळा सुरु झाल्या तर मी पण शाळेत (school) जाऊ शकेन. कोरोना आणि लॉकडाउन या काळात माझ्या आईचं महिन्याचं उत्पन्न बंद झालं. माझी आई स्कूल बस अटेन्टंडंट आहे. मात्र कोरोना आणि लॉकडाउन काळात शाळाच बंद आहेत त्यामुळे आईला मिळणारा पगार बंद झाला' अस या मुलानं सांगितलं.

दरम्यान लॉकडाऊनमुळं रोजगार बंद झाल्यानं अनेकांनी भाजीपाला विकण्यास सुरुवात केली आहे. यातुन मिळणाऱ्या पैशातून ते घर चालवत आहेत. मात्र अशी परिस्थिती कायम राहिल्यास पुढे करायचं काय? ही चिंता आता या नागरिकांना सतावू लागली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा