Advertisement

फ्रान्सच्या राष्ट्रध्यक्षांविरोधात भेंडी बाजारात अनोखे आंदोलन

इस्लामविषयी वादग्रस्त टीका करणारे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमानुएल मॅक्रो यांच्याविरोधात अनोखे आंदोलन मुंबईत करण्यात आले.

फ्रान्सच्या राष्ट्रध्यक्षांविरोधात भेंडी बाजारात अनोखे आंदोलन
SHARES

इस्लामविषयी वादग्रस्त टीका करणारे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमानुएल मॅक्रो यांच्याविरोधात अनोखे आंदोलन मुंबईत करण्यात आले. मुंबईच्या भेंडी बाजारमध्ये प्रमुख रस्त्यांवर राष्ट्राध्यक्ष इमानुएल मॅक्रों यांचे १०० पेक्षा जास्त पोस्टर चिटकवण्यात आले आहेत.

सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये राष्ट्राध्यक्ष इमानुएल यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. त्यांच्या पोस्टरवरून गाड्या जाताना व्हिडिओत दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत संबित पात्रा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

संबित पात्रानं लिहिलं आहे की, 'महाराष्ट्र सरकार, हे तुमच्या राज्यात काय सुरू आहे? भारत आज फ्रान्ससोबत उभा आहे. जो जिहाद फ्रान्समध्ये होत आहे, त्या दहशतवादाविरोधात भारताच्या पंतप्रधानांनी फ्रान्ससोबत मिळून लढा देण्याची प्रतिज्ञा घेतली आहे. मग मुंबईच्या रस्त्यांवर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा अपमान का?'

भोपाळच्या रस्त्यांवरही अशाच प्रकारे पोस्टर आंदोलन झाले. इकबाल मैदानमध्ये हजारो लोकांनी जमा होऊन फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांविरोधा घोषणाबाजी केली. यानंतर विधानसभा क्षेत्राचे आमदार आरिफ मसूद आणि त्यांच्या २००० पेक्षा जास्त समर्थकांविरोधात पोलिसांनी कलेक्टरच्या आदेशाचं उल्लंघन केल्याची केस दाखल केली आहे.



हेही वाचा

मुंबईत १५ हजार जागांसाठी ९९ हजार फेरीवाल्यांचे अर्ज

धारावी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा प्रक्रिया रद्द

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा