Advertisement

धारावी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा प्रक्रिया रद्द

धारावी पुनर्विकासाबाबत २ निविदादारांच्या निविदा सचिव समितीसमोर ठेवण्यात आल्या होत्या. या प्रकल्पासाठी रेल्वेच्या जागेच्या हस्तांतरणाबाबत मुद्दा उपस्थित झाला होता.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा प्रक्रिया रद्द
SHARES

धारावी पुनर्विकास प्रकल्पाची सध्याची निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. धारावी पुनर्विकासासाठी आता नव्याने निविदा मागविण्यात येणार आहे. गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत धारावी पुनर्विकास प्रकल्पाची सध्याची निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने निविदा मागवण्याच निर्णय घेण्यात आला.

धारावी पुनर्विकास प्रकल्प करण्याचा १६ ऑक्टोबर २०१८ रोजी मंत्रिमंडळाने निर्णय घेतला होता.  त्यानुसार सध्या सुरू असलेली धारावी पुनर्विकासाची निविदा प्रक्रिया रद्द करण्याबाबत सचिव समितीने निर्णय घेतला होता. या निविदेच्या अटी व शर्तींमध्ये योग्य त्या फेर दुरुस्त्या करून नव्याने निविदा मागविण्याबाबत सचिव समितीचा निर्णय कायम करण्यात आला. या प्रस्तावाच्या अंमलबजावणी काही फेरबदल करावयाचे झाल्यास मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात येणार आहे.

धारावी पुनर्विकासाबाबत २ निविदादारांच्या निविदा सचिव समितीसमोर ठेवण्यात आल्या होत्या.  या प्रकल्पासाठी रेल्वेच्या जागेच्या हस्तांतरणाबाबत मुद्दा उपस्थित झाला होता.  महाधिवक्ता यांनी दिलेल्या अभिप्रायावर सचिव समितीने निर्णय घेऊन ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याचे ठरविले होते.हेही वाचा -

 मुंबईच्या या भागातील रुग्णसंख्येत घट; स्थानिकांना दिलासा

कोरोनामुळं आर्थिक स्थिती बिकट; १४ वर्षांच्या मुलावर चहा विकण्याची वेळRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा