कल्याण डोंबिवलीत १६० नवे रुग्ण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गुरूवारी कोरोनाचे नवीन  १६० रुग्ण आढळले.  तर एक जणाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५०,६३३ झाली आहे. यामध्ये १४१६ रुग्ण उपचार घेत असून ४८,२०६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ३४, कल्याण प ४१, डोंबिवली पूर्व ५३,  डोंबिवली प २५, मांडा टिटवाळा २, तर मोहना येथील ५ रूग्णांचा समावेश आहे.

 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ३० रुग्ण टाटा आमंत्रामधून, ७ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ४ रुग्ण पाटीदार कोविड सेंटरमधून तर इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.


हेही वाचा -

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ दिवासापासून सुरू होणार सिनेमागृह, नाट्यगृह  Diwali 2020

दिवाळीत जादा भाडे आकारल्यास खासगी वाहतूकदारांवर होणार कारवाई 


पुढील बातमी
इतर बातम्या