पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी १६४ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी १६४ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पनवेेलमधील २, नवीन पनवेलमधील २ तसेच कामोठे आणि खारघर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. २१० रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  

नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ३४, कामोठ्यातील ३२, खारघरमधील ३१, कळंबोली-रोडपाली येथील एकूण १८, नवीन पनवेलमधील १६, तळोजा रॅपिड ऍक्शन फोर्स येथील ११,  खांदा कॉलनीतील ५, नावडे येथील ६, आसुडगाव येथील २, तळोजा एमआयडीसीतील २, तळोजा वसाहतीमधील २, तसेच टेंभोडे, पेणधर, धरणा, वळवली आणि तळोजा जेल येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.  

पनवेल महापालिका हद्दीतील एकूण ६५०७ कोरोनाबाधित रूग्णांपैकी ४९४७ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून १६० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १४०० ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.


हेही वाचा - 
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पुढं ढकललं, मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ram Mandir: बोलवलं तरी अयोध्येत भूमिपूजनाला जाणार नाही- शरद पवार


पुढील बातमी
इतर बातम्या