नवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन १६८ रुग्ण

नवी मुंबईत शुक्रवारी (२० नोव्हेंबर) कोरोनाचे नवीन १६८ रुग्ण सापडले आहेत. तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४६,७८७ झाली आहे. 

शुक्रवारी बेलापूर ४९, नेरुळ ३५, वाशी १९, तुर्भे १८, कोपरखैरणे २२, घणसोली १६, ऐरोली ८, दिघामध्ये १ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ८३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. बेलापूर २१, नेरुळ १२, वाशी ९, तुर्भे १३, कोपरखैरणे ९, घणसोली १४, ऐरोली ११,  दिघामध्ये ४ रुग्ण बरे झाले आहेत.  

बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४४,५६८ झाली आहे. तर मृतांचा आकडा ९५३ झाला आहे. नवी मुंबईत सध्या १२६६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९५ टक्के झाला आहे. 

शहरात खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या देयकांच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. यासाठी पालिकेने पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी ०२२२/ ७५६७३८९  किंवा ७२०८४९००१० या व्हॉटसअॅप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचा  -

सर्वसामान्यांसाठी ५०० ते ६०० रुपयात उपलब्ध होणार कोरोनाची लस

टोलच्या दरात सरासरी १० टक्के वाढ


पुढील बातमी
इतर बातम्या