नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन १७२ रुग्ण

नवी मुंबईत गुरूवारी (२९ ऑक्टोबर) कोरोनाचे नवीन १७२ रुग्ण सापडले आहेत. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४४,२२२ झाली आहे.

गुरूवारी बेलापूर ३७, नेरुळ २७, वाशी २१, तुर्भे १६, कोपरखैरणे २५, घणसोली १९, ऐरोली २२, दिघामध्ये ५ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात २४५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. बेलापूर ४४ नेरुळ ५१, वाशी ३३, तुर्भे २७, कोपरखैरणे २९,  घणसोली १९, ऐरोली ३५, दिघामधील ७ रुग्ण बरे झाले आहेत.  

बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१,४२१ झाली आहे. तर मृतांचा आकडा ८९२ झाला आहे. नवी मुंबईत सध्या १९०९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९३ टक्के झाला आहे. 

शहरात खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या देयकांच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. यासाठी पालिकेने पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी ०२२२/ ७५६७३८९  किंवा ७२०८४९००१० या व्हॉटसअॅप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचा -

Coronavirus Updates: मुंबईत चाचण्यांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत घट

नवी मुंबईत महिन्यात रुग्ण दुपटीचा कालावधी १८६ दिवसांवर


पुढील बातमी
इतर बातम्या