Advertisement

Coronavirus updates: मुंबईत चाचण्यांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत घट

सप्टेंबरमध्ये एकूण चाचण्यांच्या १७ टक्के अहवाल बाधित येत होते, तर ऑक्टोबरमध्ये हे प्रमाण १४ टक्क्यांवर आले आहे.

Coronavirus updates: मुंबईत चाचण्यांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत घट
SHARES

कोरोनाच्या (coronavirus) वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी महापालिका (bmc) दिवसेंदिवस शर्तीचे प्रयत्न करत आहे. कोरोनाबाधित व इतरांना याचा धोका निर्माण होऊ नये यासाठी विविध उपक्रम महापालिकेकडून हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये महत्वाचं म्हणजे चांचण्यांच्या प्रमाणात महापालिकेनं वाढ केली आहे. मुंबईत सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये चाचण्यांचं (coronavirus test) प्रमाण वाढवण्यात आलं. परंतू, चाचण्यांच्या तुलनेत कोरोना बाधितांचं प्रमाण कमी झाल्याचं निदर्शनास येत आहे.

सप्टेंबरमध्ये एकूण चाचण्यांच्या १७ टक्के अहवाल बाधित येत होते, तर ऑक्टोबरमध्ये हे प्रमाण १४ टक्क्यांवर आले आहे. तसंच, दर दिवशी केल्या जाणाऱ्या चाचण्यांमधील बाधितांचं प्रमाणही आता कमी झालं आहे. सध्या दर दिवशी १६ ते २० हजार चाचण्यांचं लक्ष्य आहे. दर दिवशी एवढ्या चाचण्या होत नसल्या तरी आधीच्या तुलनेत चाचण्यांचं प्रमाण नक्कीच वाढलं आहे. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत ३,५२,७७० चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ४७,७४८ रुग्णांचे अहवाल बाधित आले.

कोरोनाबाधित असण्याचा दर १३.५३ टक्के होता. तेच सप्टेंबरमध्ये २,९४,६४९ चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ४९,३३४ रुग्ण बाधित आढळले होते. त्यावेळी बाधितांचं प्रमाण १७ टक्के होते. चाचण्या वाढवल्या असतानाही बाधितांचं प्रमाण कमी झालं हे करोना आटोक्यात येत असल्याचं लक्षण मानलं जात आहे.

आतापर्यंत मुंबईत एकूण १४ लाख ६८ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी २,५२,८८८ करोनाबाधित आढळले आहेत. त्यानुसार, मुंबईतील बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण १७.१७ टक्के आहे. मुंबईत चाचण्यांचे प्रमाण वाढवल्यानंतर ऑक्टोबर महिन्यापासून दर दिवशी आढळणाऱ्या बाधितांची टक्के वारीही घसरली आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत दरदिवशी होणाऱ्या चाचण्यांपैकी २० टक्क्यांहून अधिक अहवाल बाधित येत होते. मात्र ऑक्टोबर महिन्यात हे प्रमाण १० ते १५ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.



हेही वाचा -

मास्क न घालणाऱ्यांविरोधात पालिकेचं पुढचं पाऊल

Bigg Boss 14: मराठीच्या अवमानप्रकरणी कलर्स वाहिनीकडून मुख्यमंत्र्यांना माफिनामा


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा