Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
58,76,087
Recovered:
56,08,753
Deaths:
1,03,748
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,122
660
Maharashtra
1,60,693
12,207

Bigg Boss 14: मराठीच्या अवमानप्रकरणी कलर्स वाहिनीकडून मुख्यमंत्र्यांना माफिनामा

मराठी भाषेच्या अवमानप्रकरणी गायक जान सानू याच्याविरोधात शिवसेना आणि मनसेने आक्रमत भूमिका घेतल्यावर कलर्सकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माफिनामा सादर करण्यात आला आहे.

Bigg Boss 14: मराठीच्या अवमानप्रकरणी कलर्स वाहिनीकडून मुख्यमंत्र्यांना माफिनामा
SHARES

मराठीची चीड येते, म्हणत मराठी भाषेचा अपमान करणारा कलर्स वाहिनीवरील बिग बाॅस रियालिटी शो मधील स्पर्धक आणि गायक जान सानू याच्याविरोधात शिवसेना आणि मनसेने आक्रमत भूमिका घेतल्यावर कलर्सकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माफिनामा सादर करण्यात आला आहे.

जान सानू हा बाॅलिवूडमधील प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा आहे. जान सानू बिग बॉसच्या १४ व्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. एका एपिसोडमध्ये स्पर्धक निक्की तांबोळी आणि जान सानू यांच्यात वाद झाला. त्यावेळी निक्की तांबोळी मराठीत बोलत असल्याने मला मराठी भाषेची चीड येते, असं वक्तव्य जान सानूने केलं होतं. हा एपिसोड प्रसिद्ध होताच शिवसेना आणि मनसेने या वक्तव्यावर आक्षेप घेतला. जान सानूची बिग बाॅसमधून ताबडताेब हाकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने केली. (colors channel apologize cm uddhav thackeray for jan sanu abusing statement for marathi language in bigg boss season 14)

हेही वाचा- Bigg Boss 14: मराठी भाषेचा अपमान करेल त्याला भर रस्त्यात थोबडवू- अमेय खोपकर


तर जान कुमार सानू... मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी... मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नाॅमिनेट करतोय याला. मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवणार लवकरच आता आम्ही मराठी आणि कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं, असं म्हणत मनसेने नेते अमेय खोपकर यांनी जान सानूला इशारा दिला.

हा वाद अधिक चिघळण्यापूर्वीच कलर्स वाहिनीनं सावध पावलं उचलतं दिलगिरी व्यक्त केली आहे. कलर्स वाहिनीनं झालेली चूक मान्य करत महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली आहे. '२७ ऑक्टोबरला प्रसारित झालेल्या बिग बॉसच्या एपिसोडसंदर्भात काही आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. त्याची दखल घेऊन संबंधित भाग सर्व एपिसोड्समधून काढून घेण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मराठी भाषेसंदर्भातल्या विधानामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही माफी मागतो. आम्ही मराठी प्रेक्षकांचा आदर करतो. भारतातल्या सगळ्याच भाषांचा आम्ही आदर करतो, असं कलर्स वाहिनीने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा