Advertisement

bigg boss 14: मराठी भाषेचा अपमान करेल त्याला भर रस्त्यात थोबडवू- अमेय खोपकर

मुंबईत राहून मराठी भाषेचा अपमान करायचा नाही. तुमच्या टीआरपीसाठी मराठी भाषेचा अपमान करायचा नाही. मला पत्र लिहून माफी न मागता बिग बॉसच्या शोमध्ये माफी मागा तर मुंबईत बिग बॉसचे शूटींग होणार नाही

bigg boss 14: मराठी भाषेचा अपमान करेल त्याला भर रस्त्यात थोबडवू- अमेय खोपकर
SHARES

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणजे बिग बॉस. यंदाच्या १४ व्या पर्वात छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी या शो सहभागी झाले आहेत. बिग बॉसमध्ये (bigg boss) नेहमीच आपल्याला काहीना काही कारणावरून नवे वाद झाल्याचं पाहायला मिळतात. या बिग बॉस दोन स्पर्धकांमध्ये हाणामारी होते तर, काही जण आपल्या प्रेमाच्या जगात हरवलेले असतात. परंतू, प्रेम म्हटलं तर वाद तर होणारच, अशाच काहीसा प्रकार बिग बॉसमध्ये घडला आहे. प्रेमाचा त्रिकोण समोर आल्यानंतर नवी खडाजंगी सुरू झाली आहे. गायक राहुल वैद्य, जान कुमार सानू (Jaan Sanu) आणि निक्की तंबोली यांच्यात आपापसांत जोरदार वाद सुरू आहेत.

या वादादरम्यान जान कुमार सानूनं मराठी गायक राहुल वैद्य याच्यावर शाब्दिक हल्लाबोल करताना  'मराठी' भाषेबद्दल अपमानकारक शब्द उच्चारले. ही व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, यावर आता मनसे निशाणा साधला आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी (Ameya khopkar) जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला आहे.

या व्हिडीओमध्ये खेळादरम्यान झालेल्या वादात जान कुमार सानूनं निक्की तंबोलीशी बोलताना मराठी भाषेची चीड येत असल्याचं म्हटलं. 'बिग बॉस'च्या घरात मराठमोळा गायक राहुल वैद्य स्पर्धक म्हणून सामील झाला आहे. या कार्यक्रमात जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्या दरम्यान घनिष्ठ मैत्री दाखवण्यात आली होती. काही कारणानं या दोघांमध्ये बिनसल्यानं निक्कीनं जानची साथ सोडत राहुल वैद्यचा हात धरला आहे.

राहुलशी ती मराठीत संवाद साधण्याच्या प्रयत्न करताना दिसते. याच दरम्यान तिने जानशी देखील मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जानने तिला, 'माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल', असं म्हंटलं. तसंच, 'मला मराठी ऐकून चीड येते', असंही त्यानी म्हटलं.

जान कुमार सानूच्या या वक्तव्याचा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. 'जान कुमार सानू…मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी…मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला. मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवनार लवकरच आता आम्ही मराठी. आणि कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं', असं ट्विट करत अमेय खोपकर यांनी जान कुमार सानूला इशारा दिला आहे.

'कुमार सानू यांचा मुलगा याचं काय करायचं, याला कशी मराठीची चिड येते, ते त्याला नक्की दाखवू. पण जर २४ तासाच्या आत बिग बॉसनं किंवा कलर्सने माफी मागितली नाही, तर बिग बॉसचं गोरेगावमधील शूटींग होऊ देणार नाही, याला धमकी किंवा इशारा काय समजायचं ते समजा. पण त्या सेटचं काय होईल, याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनानं घ्यायची. मुंबईत राहून मराठी भाषेचा अपमान करायचा नाही. तुमच्या टीआरपीसाठी मराठी भाषेचा अपमान करायचा नाही. मला पत्र लिहून माफी न मागता बिग बॉसच्या शोमध्ये माफी मागा तर मुंबईत बिग बॉसचे शूटींग होणार नाही', असंही अमेय खोपकर यांनी म्हटलं. 'कुमार सानू हे ज्येष्ठ गायक, संगीतकार आहे. त्यांचा मी नक्की आदर करतो. पण ते गाणं शिकता शिकता मुलावर संस्कार करायला विसरले', असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.



हेही वाचा -

सर्वांसाठी सुरु होणार मुंबई लोकल?

केंद्र सरकारची मोठी घोषणा! ‘या’ ठिकाणी लॉकडाऊन सक्तीचा


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा