Advertisement

नाहीतर, बिग बाॅस बंद पाडू- अमेय खोपकर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील आरोप केले आहेत. राज ठाकरे यांना बाळासाहेबांची खुर्ची हवी होती, ती मिळाली नाही म्हणूनच ते तोडफोड करतात, असं म्हणत तनुश्रीनं राज ठाकरे यांच्यासाठी 'नालायक' शब्द वापरला आहे.

नाहीतर, बिग बाॅस बंद पाडू- अमेय खोपकर
SHARES

अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ता हीनं चक्क महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील आरोप केले आहेत. राज ठाकरे यांना बाळासाहेबांची खुर्ची हवी होती, ती मिळाली नाही म्हणूनच ते तोडफोड करतात, असं म्हणत तनुश्रीनं राज ठाकरे यांच्यासाठी 'नालायक' शब्द वापरला आहे. तनुश्रीच्या या वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. 'बिग बाॅस'मध्ये एण्ट्री मिळावी म्हणून काहीही बोलत सुटणाऱ्या तनुश्रीला 'बिग बाॅस'मध्ये घेतलं तर ह शो बंद पाडू, अशा इशारा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिला आहे.


नाना घेणार पत्रकार परिषद

नाना पाटेकर यांच्याविरोधात गैरवर्तनाचे आरोप केल्यानंतर तनुश्री चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. तनुश्रीच्या या गंभीर आरोपांना नाना पाटेकरांनीही आता गांभीर्यानं घेत तिला नुकतीच कायदेशीर नोटीस बजावली आहे. येत्या काही दिवसांतच मुंबईत पत्रकार परिषद घेत नाना पाटेकर या प्रकरणी आपली भूमिका मांडणार आहेत.


मनसेशी पंगा

असं असताना तनुश्रीनं राज ठाकरे आणि मनसैनिकांशी पंगा घेतला आहे. राज ठाकरे आणि मनसैनिकांविरोधात तनुश्रीनं एका मुलाखतीत चांगलीच आगपाखड केली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपली कार फोडली होती. राज ठाकरेंना बाळासाहेबांची खुर्ची हवी होती. पण त्यांना ती मिळाली नाही, त्यामुळंच ते आणि त्यांचे कार्यकर्ते तोडफोड करतात असंही तिनं म्हटलं आहे. इतकंच काय तर नालायक माणसं स्वत: ला सिद्ध करण्यासाठी अशा काही तरी गोष्टी करतात. राज ठाकरे यांनी आपल्यासारख्याचं लोकांना पक्षात घेतलं आहे, असंही तिनं म्हटलं आहे.


तिखट प्रतिक्रिया

तनुश्रीच्या या वक्तव्यानंतर मनसेमधूनही तिखट आणि आक्रमक प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. मनसेचे संदीप देशपांडे यांनी तर कोण तनुश्री दत्ता? असं म्हणत याबाबत प्रतिक्रिया देण्याइतपतही तीची लायकी नसल्याचं म्हणत तिच्यावर टीका केली आहे. तर 'बिग बाॅस'मध्ये एण्ट्री मिळावी यासाठी कोणत्याही थराला जात काहीही वक्तव्य तनुश्री करत असल्याचं खोपकर म्हणाले आहेत. एवढंच नाही, तर तिला तर 'बिग बाॅस'मध्ये घेतलं तर मनसे चित्रपट सेना 'बिग बाॅस' शो बंद पाडेल, असा इशारा खोपकरांनी दिला आहे.हेही वाचा-

वाचाळ बडबड! नाना पाटेकरांची तनुश्रीला नोटीस

Exclusive : कॅामन मॅन रिअॅक्ट झाला तरच अॅथॅारिटीचे डोळे उघडतील : महेश मांजरेकरसंबंधित विषय
Advertisement