Advertisement

मास्क न घालणाऱ्यांविरोधात पालिकेचं पुढचं पाऊल

यापुढे एक तास रस्ता साफसफाई करावी लागेल किंवा भिंतीवरील रंगरंगोटी साफ करावी लागू शकते.

मास्क न घालणाऱ्यांविरोधात पालिकेचं पुढचं पाऊल
SHARES

नियमांचं उल्लंघन करणार्‍यांविरोधात पालिकेनं कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मास्क न घालणाऱ्यांविरोधात पालिकेनं एक मोहीम सुरू केली. या अंतर्गत मास्क न घातलेल्यांकडून २०० रुपये वसूल केले जातील. पण अनेकदा मास्क न घालणारे पालिका अधिकाऱ्यांसोबत वाद घालतात. अशांसाठी पालिकेनं नवीन शक्कल लढवली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं मास्क न घालण्यासाठी २००रुपये दंड भरण्यास नकार दिल्यास सामाजिक सेवा करण्याची योजना आखली आहे. २०० रुपये न देण्याच्या पवित्र्यात असणाऱ्यांना यापुढे एक तास रस्ता साफसफाई करावी लागेल किंवा भिंतीवरील रंगरंगोटी साफ करावी लागू शकते. ही शिक्षा प्रशासनाच्या घनकचरा व्यवस्थापन उप-कायद्यांनुसार लागू केली जाईल.

शिवाय, कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचे महत्त्व जनजागृती करण्यासाठी पालिका सोशल मीडिया आणि होर्डिंग्ज वापरत आहे. अहवालानुसार, २१ ऑक्टोबरपर्यंत १०,००,००० नागरिकांना एप्रिलपासून सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्याबद्दल २.३० कोटी दंड ठोठावण्यात आला आहे. त्यापैकी १ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर दरम्यान ८२ हजार हून अधिक उल्लंघनकर्त्यांकडून १.६४ कोटी वसूल केले गेले.

दरम्यान, महाराष्ट्रात रविवारी कोरोनव्हायरसची ६ हजार ०५९ प्रकरणं नोंदवण्यात आली. राज्यात कोविड १९ च्या रुग्णांची संख्या १४ लाख ४५ हजार ०२० इतकी आहे. दिवसभरात एकूण ५ हजार ६४८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यामुळे वसुलीची संख्या १४ लाख ६० हजार ७५५  इतकी झाली, अशी माहिती विभागानं प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.



हेही वाचा

कोरोना चाचणी आता आणखी स्वस्त, 'हे' आहेत नवीन दर

कोविशिल्डच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा