Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,38,973
Recovered:
44,69,425
Deaths:
76,398
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
45,534
1,794
Maharashtra
5,90,818
37,236

नवी मुंबईत महिन्यात रुग्ण दुपटीचा कालावधी १८६ दिवसांवर

नवी मुंबईत ऑगस्टमध्ये रुग्णदुपटीचा कालावधी ४५ दिवस होता. तो आता १८६ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबई, ठाणे, पनवेल शहरांपेक्षा हा कालावधी जास्त आहे.

नवी मुंबईत महिन्यात रुग्ण दुपटीचा कालावधी १८६ दिवसांवर
SHARES

नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. महिनाभरात येथील रुग्ण दुपटीचा काळ ८० दिवसांवरून तब्बल १८६ दिवसांवर गेला आहे. पालिका क्षेत्रात एक आठवड्याच्या आधी रोज ४०० च्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळत होते. आता हा आकडा २०० च्या आत आला आहे.

नवी मुंबईत ऑगस्टमध्ये रुग्णदुपटीचा कालावधी ४५ दिवस होता. तो आता १८६ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबई, ठाणे, पनवेल शहरांपेक्षा हा कालावधी जास्त आहे. येथील उपचार घेत असलेल्या रुग्णांतही आठ दिवसांपासून घट होत आहे. 

कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असली तरी नागरिकांनी आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे. मार्च महिन्यात नवी मुंबईत करोनाचा पहिला रुग्ण सापडला. आतापर्यत नवी मुंबईत एकूण ४४ हजार रुग्ण आढळले आहेत. तर८२ जणांचा मृत्यू झाला आहे.

मागील महिन्यात रोज सरासरी ३०० ते ३५० नवे रुग्ण सापडत होते. त्यामुळे पालिकेने आरोग्य सुविधांत दुपटीने वाढ केली. मागील तीन महिन्यांत खाटांची संख्या दुप्पट झाली असून चाचण्यांची संख्याही मोठय़ा प्रमाणात वाढवलेली आहे. मागील आठवडाभरापासून रुग्णसंख्या घटत आहे. हेही वाचा - 

कोरोना इफेक्ट : रुग्णांमध्ये आढळतोय मल्टीसिस्टम प्रक्षोभक सिंड्रोम

केंद्र सरकारची मोठी घोषणा! ‘या’ ठिकाणी लॉकडाऊन सक्तीचासंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा