पनवेलमध्ये मंगळवारी १७५ कोरोना रुग्णांची नोंद

पनवेल महानगरपालिका हद्दीत मंगळवारी १७५ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. येथील रुग्णांची संख्या आता ४१५५ वर पोहोचली आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे गेल्या २ दिवसांत पनवेल मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. आतापर्यंत ९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नव्या रुग्णांपैकी पनवेलमधील ४३, नवीन पनवेलमधील २१, कळंबोलीतील २१, कामोठे २९, खारघरमधील ४७, तळोजातील १४ रूग्णांचा समावेश आहे. मंगळवारी १३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.पनवेल ४६, नवीन पनवेल १८, कळंबोली १८, कामोठे २०, खारघर १९, तळोजातील १३ रुग्ण बरे झाले आहेत.

मागील काही दिवस पनवेल महानगरपालिका हद्दीत रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. महानगरपालिकेने घोषित केलेला कडक लॉकडाउन रुग्णसंख्या रोखण्यात अपयशी ठरत  आहे. आता पनवेल महानगरपालिका हद्दीत लाॅकडाउन दिनांक २४ जुलैपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.


हेही वाचा -

‘धारावी पॅटर्न’ मध्ये पोलिसांची कामगिरी ही खरीच कौतुकास्पद – अनिल देशमुख

गूड न्यूज! कोरोना रुग्णाच्या वाढीत घसरण, रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात ७० टक्क्यांपर्यंत वाढ


पुढील बातमी
इतर बातम्या