दिलासादायक! धारावीत बुधवारी अवघे १८ रुग्ण सापडले

कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या धारावीतून एक दिलासादायक बातमी आहे.  बुधवारी धारावीत केवळ कोरोनाचे 18 रुग्ण सापडले आहेत. मागील काही दिवसांपासून धारावीत रोज सरासरी 40 ते 45 कोरोना रुग्ण सापडत आहे.

धारावीत कोरोना रुग्णांची संख्या आता  1 हजार 639 झाली आहे. बुधवारी सापडलेल्या नव्या रुग्णांमध्ये दामोदर बिल्डिंग, लाल बहादूर शास्त्री नगर, आझाद नगर, जय भवानी सोसायटी, ९० फूट रोड, मित्रसंघम हौसिंग सोसायटी, मुकुंद नगर, नेताजी सोसायटी, पीएमजीपी कॉलनी, कुंभारवाडा, धारावी क्रॉस रोड, ६० फूट रोड आणि गुल मोहम्मद चाळ येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. तर माटुंगा लेबर कँम्प येथे ५ रुग्ण सापडले आहे. धारावीत करोनामुळे आतापर्यंत ६० जणांचा मृत्यू झाला आहे. 

धारावीत मंगळवारी 38 नवे कोरोना रुग्ण सापडले होते. त्यामुळे धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या 1621 वर पोहोचली होती. तर माहीममध्ये 24 रुग्ण सापडल्याने येथील रुग्णसंख्या 375 झाली होती. दादरमध्ये 6 नवे करोना रुग्ण सापडल्याने दादरमधील करोना रुग्णांचा आकडा 245 वर गेला होता. दरम्यान, धारावी, माहीम आणि दादरमध्ये काल एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचं पालिका प्रशासनाने स्पष्ट केलं होतं.


हेही वाचा -

'या' 5 वॉर्डमध्ये 2 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण

पालिकेची नवी रणनिती, एका रुग्णाच्या संपर्कातील १५ व्यक्तींचा घेणार शोध


पुढील बातमी
इतर बातम्या